कणकवली दिनांक : २७ जून २०२० :
कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नाभिक व्यावसायिकांना स्वतःची व आपल्या ग्राहकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक सेवा देणे ही काळाची गरज बनली आहे. यासाठी ग्राहकांना सध्या सिंधुदुर्गातील नाभिक व्यावसायिक अत्यंत चांगल्या दर्जाची व सुरक्षित सेवा देत आहेत. ग्राहक- कारागीर दोहोंच्या हितासाठी युज अँड थ्रो प्रकारचे साहित्य वापरणे बहुसंख्य नाभिक बांधवांनी सुरु केले आहे. सलून मध्ये प्रवेश केल्यापासून विविध अटी शर्तींचे पालन करत नाभिक व्यावसायिक इमाने इतबारे आपली सेवा बजावताना दिसत आहेत. सध्या वापरत असलेले विघटनशील साहित्य महागडे आहे. त्यामुळे सुरक्षित सेवा देत असताना ग्राहकाची आणि स्वतःची काळजी घेण्याच्या खटाटोपात ग्राहकांना जादा दर द्यावे लागत आहेत. त्यामुळे नाईलाजाने किंवा काळाची गरज म्हणून यापुढे सलून दर वाढणे अपरिहार्य असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या सभेमध्ये केले.
नुकतीच अनिल अणावकर यांच्या कणकवली निवासस्थानी कणकवली तालुका नाभिक संघटनेची सभा सुरक्षित अंतर ठेवून, सॅनिटायझर, मास्क यांचा वापर करून घेण्यात आली. त्यावेळी कणकवली शहरातील विभागीय अध्यक्ष , महत्त्वाचे पदाधिकारी , सलून मालक- चालक , कारागीर असे मोजकेच नाभिक बांधव उपस्थित होते. शासकीय नियमांचे पालन करत सध्या सलून व्यवसाय सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु आहेत. फक्त ७ तास सेवा असूनही ग्राहकबंधू नाभिक व्यावसायिकांना सहकार्य करत असल्याबद्दल जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले.
सलूनमध्ये प्रवेश करताना ग्राहकाला सॅनिटायझर वापरायला देणे, युज अँड थ्रो ची चादर वापरणे, युज अँड थ्रो टॉवेल वापरणे, त्वचेशी जास्त संपर्क येणार नाही असे काम करणे, काम करताना अजिबात न बोलणे, आलेल्या सर्व ग्राहकांच्या नोंदी ठेवणे, एक ग्राहक झाल्यानंतर खुर्ची निर्जंतुक करणे, वापरलेल्या युज अँड थ्रो साहित्याचे विघटन करणे, नॉन डिस्पोजेबल साहित्याचे प्रत्येक वेळी निर्जंतुकीकरण करणे इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून सूचना देण्यात आल्या.
शहरी विभागासाठी व एसी सेवा देत असलेल्या सलूनचे दरपत्रक निश्चित करण्यात आले. कनेडी, खारेपाटण, नांदगाव, फोंडा आणि तळेरे अशा निमशहरी विभागाचे दरपत्रक बनवण्याचे अधिकार त्या विभागीय अध्यक्ष व कार्यकारिणीला देण्यात आलेले असल्याने ते आपला निर्णय घेतील असे ठरवण्यात आले. यापुढे युज अँड थ्रो च्या साहित्याचे दर वाढत जाणार असल्याने पुढील काळाला अनुसरून दर आकारणी सर्वानुमते करण्यात आली. ग्राहकांना सुरक्षित सेवा देत असल्याने दर वाढत आहेत, तरीही सुजाण ग्राहक कोणत्याही प्रकारची तक्रार न करता नाभिक व्यावसायिक चांगली सुरक्षित सेवा देत असल्याने समाधानी असल्याचे मत सर्वच सलून चालक , मालक आणि कारागीर यांनी व्यक्त केले.
दरपत्रकासंदर्भात सोमवार दिनांक २९ जून २०२० रोजी वेताळबांबर्डे येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय सभेमध्ये योग्य निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल असे प्रतिपादन जिल्हा सल्लागार सुभाष चव्हाण यांनी केले. लॉकडाऊन काळात निधन पावलेल्या नाभिक बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्ष लक्ष्मीकांत चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले.