Monday, October 2, 2023

पुणे युनिव्हर्सिटी उद्यानातील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आकर्षित करुन घेतो.

 





जयकर ग्रंथालय म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी च्या अभ्यासू मुलांसाठी वाचनाची पर्वणीच.



 

ट्रॅफिक जॅम ही पुण्यातील कायमची डोकेदुखी

 




👆🏻श्री. सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट कडून मोफत खिचडी प्रसाद वाटप करण्यात येते. गरजू विद्यार्थ्यांना खरंच खूप चांगली सोय केली आहे. अन्नदान हेच श्रेष्ठदान.

 


पुण्यातील गणेश मंदिरे पाहिली की फोटो काढण्याचा मोह होतो.

 










सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : मुलींच्या वसतिगृहाचे प्रवेशद्वार

 


पुण्यात जाऊन आज ही पुस्तकरुपी खरेदी केली.

 










Wednesday, June 21, 2023

योग आपल्याला स्वतःशी जोडतो : डॉ.आत्माराम कांबळे

 योग आपल्याला स्वतःशी जोडतो : डॉ.आत्माराम कांबळे

          जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व अजीवन अध्ययन विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक योगा दिन उत्साहपूर्ण साजरा करण्यात आला.

          युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार, केंद्रीय आयुष्य मंत्रालय आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मुंबई विद्यापीठ यांच्याकडून मिळालेल्या निर्देशानुसार आंतरराष्ट्रीय योगा दिन 82 स्वयंसेवकांच्या सहभागातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

          जगभरात योगाबद्दल जनजागृती करण्यासाठी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. आज मंगळवारी जगभरात आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. या दिवशी जगातील अनेक देशांतील लोक एकत्र येतात आणि योग दिवस साजरा करतात.

          मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचं मोठं महत्व आहे. भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या योगाला आज जगभरात मोठं महत्व मिळालं आहे. या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची (Yoga) सुरुवात 21 जून 2015 पासून झाली. या प्राचीन भारतीय पद्धतीला जगमान्यता, राज मान्यता मिळवून देण्यासाठी मोदी सरकारनं मोठा पुढाकार घेतला. 27 सप्टेंबर 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्र संघातील आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाची गरज व्यक्त केली. भारतातर्फे संयुक्त राष्ट्र महासभेत योग दिवसाची शिफारस केली. 193 पैकी 175 देशांनी प्रस्ताव तात्काळ स्वीकारला. एखादा प्रस्ताव एवढ्या कमी वेळेत म्हणजे 90 दिवसाच्या आत एवढ्या मोठ्या देशांनी स्वीकारण्याची पहिलीच वेळ होती.

          भारतीय आयुष मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम निवडली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यावेळी 'योगा फॉर ह्युमॅनिटी' (Yoga For Humanity) ही आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम म्हणून निवडण्यात आली आहे. या दिनाचे औचित्य साधून प्रात्यक्षिक व भित्तीपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.'योगा फॉर ह्युमॅनिटी' (Yoga For Humanity)  ज्याचा अर्थ मानवतेसाठी योग आहे. ज्ञान संपादन करणे आणि नंतर ते पुढच्या पिढीला देणे ही क्षमता केवळ मानवाला प्राप्त झालेली आहे. त्यामुळेच ज्ञानाच्या विविध शाखा निर्माण झाल्या. आजच्या आधुनिक युगात, व्यग्रतेमध्येही योगासनं शरीर निरोगी आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. सर्व शारीरिक आणि मानसिक आजारांना शरीरापासून दूर ठेवण्यासोबतच योगाचा प्रत्येकाच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो. रोज योगासनं केल्यानं शारीरिक आणि मानसिक उर्जेच्या विकासासोबत तणाव आणि नैराश्यही कमी होतं. म्हणून शरीर निरोगी आणि मन शांत ठेवण्यासाठी योगा एक वरदान असे म्हणने वावगे ठरणार नाही, तसेच योग आपल्याला स्वतःशी जोडतो असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे यांनी केले.

          या प्रसंगी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक तथा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कक्ष कार्यक्रम अधिकारी व महाविद्यालयीन कर्मचारी समन्वयक श्री. वसीम सय्यद, कला शाखा प्रमुख सहा. प्रा. प्रकाश शिंदे, वाणिज्य शाखा प्रमुख सहा. प्रा. मोहम्मदअली मुन्शी, मराठी विभाग प्रमुख सहा. प्रा. रश्मी देसाई, शैक्षणिक व विद्यार्थी आणि कर्मचारी कल्याण समिती प्रमुख आणि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख सहा. प्रा. प्रज्योत नलावडे, संगणक प्रयोगशाळा सहा. प्रा. नमिरा मुजावर व प्राध्यापकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष विद्यार्थी  प्रतिनिधि कु. आरती पवार, कु. अमृता जगताप, कु. हर्षाली सावंत, कु. पृथ्वीक सावंत, कु.अजय शेलार, कु. सुरज गोठणकर आदी राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवकांनी उत्साहपूर्ण सहभाग घेऊन ही योगशाळा यशस्वीरित्या संपन्न केली. या योगशाळा प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून कु. अपूर्वा खानविलकर यांनी भुमिका बजावली.








Monday, June 19, 2023

देह दान केल्यानंतरचे संशोधनाचे निष्कर्ष...

देह दान केल्यानंतरचे संशोधनाचे निष्कर्ष...

          36 वर्षांच्या तरूणाला कर्करोग झाला जो शेवटच्या टप्प्यावर होता. तरूणपणात त्याने कधीही गुटखा, सिगारेट, पान, तंबाखू आणि दारूचे सेवन केले नाही. 

वेळेवर कामावर गेला, त्याला कसले वाईट व्यसन नव्हते. कुटुंबासह सुखी होता. त्याला कसला आजार नव्हता, चिंता नव्हती.

       फक्त 2/3 दिवसांपासून पोटात दुखणे सुरू झाल्यामुळे डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू केले. 

पण कोणताही फायदा न झाल्यामुळे, त्याच्या वडीलांनी मोठ्या डॉक्टरांना भेटून त्याचे सर्व अहवाल तेथे दाखविले आणि त्यांना कळले की,... पोटाच्या आतड्यांमध्ये कर्करोग आहे.

डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले, उपचारा दरम्यान घर गहाण ठेवले. दागिने विकले गेले, परंतु परिणामी त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरानी कुटुंबाला त्याचा अग्नि संस्कार न करण्याचा सल्ला दिला. त्यांना मानवी सेवेसाठी शरीरावर संशोधन करण्यासाठी रुग्णालयात दान करा असे सांगितले. आणि त्यांनी दान केले.

संशोधनानंतर असे आढळून आले की,...प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यायल्याने त्यांतून बाहेर पडणाऱ्या रसायनामुळे त्यांना कर्करोग झाला होता... त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या कुटुंब आणि सहकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांच्या खाण्यापिण्या विषयी चौकशी केली. त्याला चहा पिण्याची सवय होती. तो दिवसातून पाच ते सहा कप चहा प्यायचा.  मग हे सुद्धा समजले की,...आपण जिथून चहा मागवतो तो चहा प्लास्टिकच्या पिशव्यांमधून येत असे आणि चहा प्लास्टिकच्या कपा मध्ये दिला जात असे. अनेकदा असे दिसून आले आहे की,... लोकांना दुकानातून किंवा भोजनाच्या ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्यांमधून गरम चहा, गरम भाज्या, सुप किंवा इतर तत्सम वस्तू घ्याव्या लागतात, ते खातात किंवा पित असतात, ते हळूहळू तुमच्या शरीरात कर्करोगाचे जंतू तयार करतात.मग,...डॉ.ने त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांची वैद्यकीय चाचणी केली, तर,..असे आढळून आले की,..त्यांचे अनेक सहकारी कर्करोगाने ग्रस्त आहेत. मग डॉक्टरांनी त्यांना कर्करोगाचा उपचार करण्याचा सल्ला दिला.प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी घातक तर आहेच. किमान गरम खाद्यपदार्थतरी प्लास्टिक पिशव्यांमध्ये, प्लास्टिकच्या भांड्यात ठेऊन खाऊ नका. असे करण्याने आपण स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना मृत्यूच्या दिशेने ढकलण्याचे काम करत आहोत.म्हणून, मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की,... शक्यतो प्लास्टिकचा वापर कमीत कमी ठेवा, प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेला चहा पिऊ नका, गरम चहा-कॉफी पिण्यासाठी प्लास्टिक किंवा पेपर कप न वापरता चिनी मातीचे किंवा स्टीलचे कप वापरा.ही पोस्ट जास्तीत जास्त ग्रुप आणि मित्रांना पाठवा आणि त्यांना पुढे पाठवण्याचा आग्रह करा. आपल्या या छोट्याशा प्रयत्नाने अनेकजण कँसर होण्यापासून वाचू शकतील.विशेष:- ही वसई मधील सत्य घटना आहे जी, वास्तवात घडली आहे, कथा नाही!

लेखिका.

डॉ. रेखा नाईक.

वसई.

साभार.

ध्यास फाऊंडेशन.

वसई.

Friday, June 16, 2023

यशाची परंपरा राखत, पुन्हा खारेपाटण महाविद्यालयाची भरारी

 🎯 यशाची परंपरा राखत, पुन्हा खारेपाटण महाविद्यालयाची भरारी

जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ८७.९१%.

          मुंबई विद्यापीठाकडून नुकताच जाहीर झालेल्या निकालात  महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. मुंबई विद्याीठाकडून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये या महाविद्यालयातून वाणिज्य शाखेद्वारे फायनान्शिअल अकाउंटिंग अँड ऑडिटिंग व व्यवसायिक व्यवस्थापन विषयात एकूण ९१ विद्यार्थ्यांपैकी ८० विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली असून, कु. शाहिस्ता खान हिने ६७.९२% मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर कु. नवेद मुकादम  व कु. सौरभ पेंडकलकर यांनी ६७.३३%, ६४.३६ % क्रमशः द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. प्रवीण लोकरे व सर्व संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर  कर्मचारी या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच चालू शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ ची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे यांच्या कडून मिळाली.