कणकवली दिनांक : १२ एप्रिल २०२० :
सर्व भारतवासी हे आमचे खास मित्र आहेत, त्यांचा आणि आमचा अगदी जवळचा संबंध येतो. नाभिक सेवा देत असताना म्हणजेच दाढी, केस आणि विविध थेरपी करत असताना आम्हा नाभिकांचा ग्राहकमित्रांशी थेट संबंध येतो. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आम्ही नाभिक बांधव ग्राहकांना सेवा न देता घरी बसून देशाची सेवा करत आहोत. आदेशाचे पालन करताना आम्ही मेटाकुटीला आलो आहोत. सेवा केली तरी अडचणीत ....कारण आमच्यामुळे कोरोना पसरेल याची भीती..किंवा आम्हालाही कोरोनाबाधितांपासून लागण होण्याची शक्यता....
पण ग्राहकांना सेवा दिली नाही तरी अडचणीत ..... कारण कुटुंबाच्या कुटुंब उपाशीपोटी राहण्याचीही भीतीच ना ?....आणि ग्राहकांच्या तीव्र निराशेला तोंड द्यावे लागणार ते वेगळेच . सध्या आमचे प्रिय ग्राहक आम्हा नाभिकांना इतके आग्रह करत आहेत कि ....हातून गुन्हा घडला तरी काम करण्यास आमचे नाभिक बांधव प्रवृत्त झाले तर ती आमच्या नाभिक बांधवांची चूक कशी म्हणायची ? ... आम्ही आमचा सेवा धर्म पाळत आहोत...बस्स....पण आम्ही आमच्या नाभिक बांधवांना कळकळीची विनंती केलेली आहे कि काहीही झाले तरी चालेल ...पण नाभिक सेवा देऊच नका....
वर्तमानपत्रातून आवाहन करून झाले. whats app वर स्टेटस ठेवले. पण आता बरेच दिवस झाले आहेत. आमच्या ग्राहकांची आणि आमच्या नाभिक बांधवांचीही सहनशीलता संपली आहे. कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत राहिलेले नाही.. कितीही विनंती करूनही आमचे नाभिक जर आमचे ऐकत नाहीत...तर आम्ही संघटनात्मक त्यांच्यावर काय दबाव आणणार ? आम्ही तर त्यांना सांगून दमलो आहोत...
आता आमच्या प्रिय ग्राहकांनाच आम्हाला जाहीर विनंती करावीशी वाटत आहे. आमच्या नाभिक व्यवसायाला आधुनिक स्वरूप आल्यापासून आम्हाला आमचे ग्राहक जे सहकार्य करत आहेत , त्याबद्द्ल त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. पण ग्राहकमित्रांनो , आमचा सुद्धा जीवच आहे. मी जिल्हाध्यक्ष या नात्याने तुम्हाला हात जोडून विनंती करतो कि, आमच्या नाभिकमित्रांना कृपया अतिआग्रह करून नाभिक सेवा देण्यासाठी गळी पाडू नका.
आम्ही तुमच्या सेवेसाठी लवकरच येणार आहोत.. त्यावेळी अधिक अत्याधुनिक पद्धतीने आपली आरोग्यदायक , तणावमुक्त सेवा देण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण सध्या तरी आपण आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. थोडे दिवस थांबलात ...तसेच आणखी थोडे दिवस थांबा. तुमचाही नाईलाज आहे, पण आम्ही तरी काय करणार ? दोघांच्याही निरोगी आरोग्यासाठी एवढेतरी आपणास करायलाच हवे. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी केले आहे.