केंद्रशाळा शेर्पेची शैक्षणिक वाटचाल आदर्शवत- एकनाथ आंबोकर
शेर्पे : दिनांक ११ डिसेंबर २०२०
शेर्पे नं.१ शाळेला शिक्षणाधिकारी प्राथमिक सिंधुदुर्ग यांनी सदिच्छा भेट दिली .त्या भेटी प्रसंगी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व स्पर्धा परीक्षा तयारी याबाबत शाळेचे कामकाज गौरवास्पद आहे असे गौरवोद्गार काढले.
शाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत गुणवंत होत असल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुकासह अभिनंदन केले. भेटीप्रसंगी रिद्धी राजू गर्जे या शाळेच्या विद्यार्थिनीचे जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.
तसेच पाचवी जिल्हा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी मध्ये पाचवी व कणकवली तालुक्यात प्रथम आलेली विद्यार्थिनी म्हणूनही तिचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले व तिला शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे ,मार्गदशक अमोल भंडारी, पालक राजू गर्जे व शारदा तांदळे यांचेही गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले.
याप्रसंगी शाळेमध्ये राबवित असलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली. शाळेला लाभलेल्या लोक सहभागाबद्दल व दात्यांच्या दातृत्वाचे विशेष कौतुक केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे , कणकवली गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर , तळेरे प्रभागाचे विस्तार अधिकारी सुहास पाताडे , कासार्डे केंद्रप्रमुख संजय पवार, शेर्पे सरपंच निशा गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष शेलार , विलास पांचाळ , दशरथ शिंगारे,अमोल भंडारी, राजू गर्जे, शारदा तांदळे उपस्थित होते.










No comments:
Post a Comment