Wednesday, December 8, 2021

तळेरे प्रभागस्तरीय ' स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ' स्पर्धा उत्साहात संपन्न


तळेरे प्रभागस्तरीय ' स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ' स्पर्धा उत्साहात संपन्न

वारगाव : दिनांक ०८ डिसेंबर २०२१ : 

        तळेरे प्रभागस्तरीय ' स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ' नुकताच वारगाव नं. ३ शाळेच्या सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी व्यासपीठावर कणकवली पंचायत समितीच्या सदस्या तृप्ती माळवदे , तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , वारगावचे माजी सरपंच इरफान मुल्ला , माजी उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना शेट्ये , भिरवंडे केंद्रप्रमुख उत्तम सूर्यवंशी , साळीस्ते केंद्रप्रमुख गोपाळ जाधव , शेर्पे व खारेपाटणचे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल , कासार्डे केंद्रप्रमुख संजय पवार , वारगाव नं. ३ शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना सावंत आदी प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानावरुन बोलताना पंचायत समिती सदस्या तृप्ती माळवदे म्हणाल्या , " सर्व स्पर्धकांनी खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा संपन्न करा व आपल्या प्रभागाचे नाव जिल्ह्यात उंचवा. "
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास पाताडे यांनी केले. त्यांनी दिवसभराच्या संपूर्ण स्पर्धेची रुपरेषा स्पष्ट केली. रांगोळी स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा , निबंध स्पर्धा आणि शिक्षक गायन स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. नाना शेट्ये आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रभागस्तरीय स्पर्धेला आलेल्या सर्वांना दुपारचे भोजन दिल्याबद्दल व सर्व सोयींची उपलब्धता दिल्याबद्दल वारगाव नं. ३ शाळेचे आभार मानले. इरफान मुल्ला यांनी उपस्थित सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धा सुरु असताना सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी स्पर्धास्थळी भेट दिली व सर्व शिक्षकांशी स्पर्धेसंदर्भात मुक्त संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव तनामनात जागवण्यासाठी प्रेरणा द्यावी असे प्रतिपादन केले. त्यावेळी उपस्थित शिक्षकांच्या वतीने केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल व उपशिक्षक सीताराम पारधिये यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 
          जाकीर शेख यांनी कार्यक्रमाचे अतिशय उत्तम रीतीने सूत्रसंचालन केले. सीताराम पारधिये यांनी सर्वांचे हार्दिक आभार मानले. कार्यक्रमाला खारेपाटण , शेर्पे , कासार्डे व साळीस्ते केंद्रातील बहुसंख्य शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच शिक्षक संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते. स्पर्धा ५ वी  ते ७ वी  , ८ वी  ते १० वी  आणि ११ वी ते १२ वी  या तीन गटांमध्ये संपन्न झाली. 



























































































































 

No comments:

Post a Comment