Tuesday, March 29, 2022

🛑 आपण इंग्रजीत बोलत असल्याचा शिक्षकांनी अभिमान बाळगा : सद्गुरू कुबल

🟢 शेर्पे केंद्रस्तर दहाव्या टॅग मिटिंगमध्ये केंद्रप्रमुख यांनी केले मार्गदर्शन

🛑 चिंचवली : 

          दरमहा इंग्रजी शिक्षकांची इंग्रजी सभा घेण्यात येते. हे दुसरे वर्ष असून शिक्षकांनी आतापर्यंत सुमारे वीस टॅग मिटिंग केल्या आहेत. या उपक्रम समूहाचा उपयोग सर्व शिक्षक आपल्या वर्गात करत आहेत. सर्व शिक्षकांनी आपल्या वर्गात जास्तीत जास्त वापर करावा. आपण इंग्रजीतून बोलतो आहोत याचा प्रत्येकाने अभिमान बाळगा असे प्रतिपादन शेर्पे खारेपाटण केंद्राचे केंद्रप्रमुख सदगुरु कुबल यांनी चिंचवली मधली शाळेत केले. 

          चिंचवली मधली शाळेत शेर्पे केंद्राची दहावी टॅग मिटिंग आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी टॅग समन्वयक गोविंद वावदाने यांनी स्वागत , प्रतिज्ञा , प्रास्ताविक आणि टॅग उपक्रम इंग्रजीमधून घेतले. त्यात उपस्थित सर्व इंग्रजी शिक्षकांनी संभाषण , भाषिक खेळ , भाषिक कोडी यांत सक्रिय सहभाग घेतला. गुगल लिंकद्वारे सर्व शिक्षकांनी इंग्रजीतून प्रतिसाद दिला. अनिल खोत यांनी सूत्रसंचालन केले. चिंचवली मधली शाळेच्या मुख्याध्यापिका प्रभा अकिवाटे यांनी सर्वांचे आभार मानले.





































No comments:

Post a Comment