🛑 शिडवणे कोनेवाडी शाळेमध्ये शिक्षण परिषद संपन्न
खारेपाटण व शेर्पे केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद 15 ऑक्टोबर 2024 रोजी शिडवणे कोनेवाडी शाळेमध्ये घेण्यात आली. शारदा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सर्व मान्यवर अधिकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सन्माननीय केंद्रप्रमुख संजय पवार साहेब यांनी प्रशासकीय मार्गदर्शन केले. सन्माननीय प्रदीप श्रावणकर सर उच्चश्रेणी मुख्याध्यापक खारेपाटण नं. 1 यांनी आर्थिक अभिलेखांसंदर्भात मार्गदर्शन केले. श्री गर्जे सर यांनी शिष्यवृत्तीचे मार्गदर्शन केले.
त्यावेळी केंद्रप्रमुख संजय पवार साहेब, उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, उच्च श्रेणी मुख्याध्यापक बागडी सर, उच्चश्रेणी मुख्याध्यापक खरात सर, शेर्पे केंद्रमुख्याध्यापक दशरथ शिंगारे सर आणि खारेपाटण व शेर्पे केंद्रातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
शिडवणे शाळा नं. १ चे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी इयत्ता सातवीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील ' गोमू माहेरला जाते ' या कवितेचे गायन केले. त्यावेळी सर्व उपस्थित शिक्षकांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शिडवणे कोनेवाडी शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी सर्वांना भोजनाची व्यवस्था केली होती. कुरंगवणे खैराटचे पदवीधर शिक्षक सन्माननीय गोविंद वावदाने सर यांनी सर्वांचे आभार मानले. मुख्यमंत्री माझी शाळा मध्ये द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल खारेपाटण नं. १ शाळेच्या मुख्याध्यापकांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले. परसबाग स्पर्धेमध्ये नंबर आल्याबद्दलही शिडवणे कोनेवाडी च्या सर्व शिक्षकवृंदांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच परसबागेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेल्या नडगीवे नंबर एक शाळेचेही अभिनंदन करण्यात आले.
केंद्रामध्ये नवीन बदली होऊन आलेल्या व नवनियुक्त सर्व शिक्षकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.






















No comments:
Post a Comment