Wednesday, December 18, 2024

तळेरे प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धा वारगाव नं. १ मध्ये मोठ्या उत्साहात सुरु

🛑 तळेरे प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धा वारगाव नं. १ मध्ये मोठ्या उत्साहात सुरु 

          वारगाव नं. १ शाळेच्या क्रीडानगरीमध्ये १८ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२४ असा दोन दिवसीय क्रीडा महोत्सव संपन्न होत आहे. त्यावेळी मा. संदेशजी सावंतसाहेब ( मा. जिल्हा परिषद अध्यक्ष सिंधुदुर्ग ) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

          मा. रविंद्रजी जठारसाहेब ( मा. सभापती, वित्त व बांधकाम समिती, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न झाले. त्यावेळी व्यासपीठावर माजी सभापती ढवळसाहेब, मा. जि. प. सदस्य संजय देसाईसाहेब, मा. पं. स. सदस्य प्रकाश पारकरसाहेब, नडगीवे न्यू इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष मनोज गुळेकरसाहेब , मा. सभापती स्नेहलता वळंजूमॅडम, नम्रता शेट्येमॅडम ( सरपंच, वारगाव ), नानासाहेब शेट्ये ( उपसरपंच, वारगाव ), तळेरे बीट ऑफिसर मा. कैलास राऊतसाहेब, मा. शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडेसाहेब, कासार्डे / खारेपाटण / शेर्पेचे केंद्रप्रमुख संजय पवारसाहेब, साळीस्ते केंद्रप्रमुख गोपाळ जाधव साहेब, वारगाव नं. १ शाळेचे अध्यक्ष विलास तळेकर, प्रभागातील उच्चश्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, क्रीडाशिक्षक, क्रीडाप्रमुख प्रवीण कुबल, उपक्रीडाप्रमुख श्रीराम विभुते, पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पालक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी खेळाडू, पंच शिक्षक, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. 

          मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यजमान शाळेच्या , गावाच्या व बीटच्या वतीने सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. यजमान शाळेच्या मुलींनी ईशस्तवन व स्वागतपद्य यांचे सुरेल गायन केले. मा. कैलास राऊतसाहेब ( तळेरे प्रभाग वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 

          सन्मा. श्री. संदेशजी सावंत यांनी मुलांना व शिक्षकांना उद्देशून शुभेच्छापर मार्गदर्शन केले. मा. रविंद्रजी जठार व मा. मनोज गुळेकर यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. क्रीडाप्रतिज्ञा घेण्यात आली. मान्यवरांच्या शुभहस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून ती मुलांच्या हातात सोपवण्यात आली. 

          १८ डिसेंबर रोजी सर्व प्रकारच्या मैदानी वैयक्तिक व सांघिक स्पर्धा संपन्न झाल्या. विजेत्यांना व उपविजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्रे देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. वारगाव नं. १ शाळेने व शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे प्रवेशद्वारावर स्वागत केले. सेल्फी पॉईंट सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. वारगाव नं. १ शाळेने सर्वांना सकाळचा नाश्ता व दुपारचे भोजन दिले. शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा लांघी यांनी सर्वांचे आभार मानले. उपक्रीडाप्रमुख श्रीराम विभुते यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. कार्यक्रम नियोजनपूर्वक संपन्न होण्यासाठी मा. नाना शेट्येसाहेब व त्यांची टीम अतिशय मेहनत घेऊन काम पाहत आहेत. 


















































































































































































































































No comments:

Post a Comment