Thursday, January 23, 2025

शिक्षक भारती शाखा कणकवली यांच्या वतीने शिष्यवृत्ती सराव परीक्षा संपन्न

           शिक्षक भारती शाखा कणकवली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता पाचवी मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा केंद्र तळेरे याठिकाणी संपन्न झाली. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण प्रेमी सदस्य श्री राजू पिसे, केंद्रप्रमुख अँड.श्री. संजय पवार साहेब,केंद्रमुख्याध्यापक श्री. सत्यवान घाडीगावकर सर, मुख्याध्यापक श्री. सत्यवान केसरकर सर, प्रभाग मुख्याध्यापक श्री. महेंद्र पावसकर सर, कणकवली तालुका अध्यक्ष श्री.श्रीराम विभूते, उपाध्यक्ष श्री. गुरुप्रसाद पाटील सर,  केंद्र मुख्याध्यापक श्री आनंद तांबे सर, श्री. संदीप ब्रह्मदंडे सर, श्री जाकीर शेखश्री. ज्ञानेश्वर सोनटक्के ,श्री मनोहर मराठे सर उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी भोजन व्यवस्थेसाठी श्री संदीप ब्रह्मदंडे पाचशे रुपये  केंद्रप्रमुख श्री.गोपाळ जाधव साहेब पाचशे रुपये श्री केंद्र मुख्याध्यापक सत्यवान घाडीगावकर सर पाचशे रुपये शिक्षणप्रेमी सदस्य राजू पिसे साहेब यांनी पाचशे रुपये दिले. पर्यवेक्षक म्हणून श्री ज्ञानेश्वर सोनटक्के सर व श्री मनोहर मराठे सर यांनी काम पाहिले. परीक्षेसाठी अँड.माननीय श्री संजय पवार साहेब यांनी विद्यार्थ्याला मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री श्रीराम विभूते सर यांनी केले.



No comments:

Post a Comment