Tuesday, September 24, 2019

टॅग मिटिंगने दिला इंग्रजी शिक्षकाला एक नवा आयाम : सद्गुरू कुबल

साळीस्ते : दिनांक २३ सप्टेंबर २०१९ :
              गेल्यावर्षीपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील इंग्रजी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची टॅग मिटिंग घेतली जाते. या महात साळीस्ते व शेर्पे केंद्राची संयुक्त टॅग मिटिंग साळीस्ते केंद्रशाळेत संपन्न झाली. त्यावेळी साळीस्ते व शेर्पे केंद्राचे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल हे  निरीक्षक म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते. ते म्हणाले कि शासनाने अशा प्रकारे टॅग मिटिंग सुरु केल्यामुळे इंग्रजी शिक्षकांना इंग्रजी बोलण्याचा सराव  करण्यासाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येक शिक्षकाने जर यात उत्साहाने सहभाग घेतल्यास सर्व प्राथमिक शिक्षक उत्तम प्रकारे इंग्रजी संभाषण करू शकतात. आपल्या इंग्रजी बोलण्याचा उपयोग प्रत्येक शिक्षकाने जर वर्गाध्यापनात केल्यास वर्गातील प्राथमिक शाळेचे विद्यार्थी इंग्रजी बोलू लागतील व त्यांच्यातील इंग्रजीची भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढीस लागेल. अशा प्रकारे घडून आल्यास जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या टिकून राहण्यास नक्कीच हातभार लागू शकतो.
                टॅग समन्वयक गोविंद वावदाने यांनी वेळापत्रकाप्रमाणे सर्व घटक घेतले. सुरुवातीला सर्व टॅग शिक्षकांचे स्वागत झाले. प्रतिज्ञा घेण्यात आली. मागील टॅग मिटिंग मधील झालेल्या घटकांवर प्रश्नोत्तरे व चर्चा घेण्यात आली. वॉर्मिंग अप उपक्रमामध्ये इंग्रजी धातुसाधित नामाचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. इंग्रजी ओघवतेपणाने बोलता यावे यासाठी विविध प्रकारे आपले व्याकरणिक इंग्रजी सुधारण्याकरिता प्रयत्न केले गेले. एरर करेक्शन या उपक्रमाद्वारे  चुकीची वाक्ये सुधारण्याचा खेळ घेण्यात आला. नंतर मेमरी गेममध्ये शिक्षकांचे दोन गट बनवून स्मरणशक्तीवर आधारित खेळ चित्रे आठवून जास्तीत जास्त शब्द सांगण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला. मिटिंग सलग ३ तास चालली. चुकत चुकत शिकत इंग्रजी बोलण्याच्या प्रयत्नांमुळे प्रत्येक शिक्षकाने आपली इंग्रजीबद्दलची भीती कमी होत आहे असे प्रतिसादामध्ये सांगितले. साळीस्ते शाळेचे पदवीधर शिक्षक सीताराम पारधिये यांनी आभार मानले.







No comments:

Post a Comment