Saturday, September 28, 2019

साळीस्ते केंद्राची शिक्षण परिषद संपन्न


तरेळे : २७/०९/२०१९ :
          साळीस्ते केंद्राची शिक्षण परिषद तरेळे नं. १ शाळेत अत्यंत शैक्षणिक वातावरणात संपन्न झाली. त्यावेळी साळीस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, विषयतज्ज्ञ भाऊसाहेब कापसे, सर्पे इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते. 
          त्यावेळी जिल्हा विद्या प्राधिकरणाने दिलेल्या नियोजनाप्रमाणे कार्यक्रम घेण्यात आले. तरेळे नं.१ शाळेच्या उपशिक्षिका साक्षी घाडीगावकर यांनी इयत्ता दुसरीच्या भाषा व गणित पुस्तकातील झालेले बदल सांगितले व त्यावर सकारात्मक चर्चा घडवून आणली. केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांनी पीजीआय व ट्विनिंग स्कुल या नवीन संकल्पनेची सविस्तर माहिती समजावून सांगितली. विषयतज्ज्ञ भाऊसाहेब कापसे यांनी दिव्यांगांचे अध्ययन अध्यापन विषयांतर्गत मतिमंद, अध्ययन अक्षम मुलांना कशाप्रकारे अध्यापन करावे याचे मार्गदर्शन केले. शेर्पे केंद्रशाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे यांनी नवोपक्रमांचे लेखन कसे करावे याविषयी थोडक्यात माहिती दिली. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन श्रीराम विभुते यांनी केले. 

No comments:

Post a Comment