शिडवणे : दिनांक २४/११/२०१९ :
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित शेर्पे केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव दिनांक २८ व २९ नोव्हेंबर असे दोन दिवस शिडवणे नं. १ शाळेच्या भव्य क्रीडांगणावर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
कार्यक्रमासाठी कणकवली पंचायत समितीच्या सदस्या तृप्ती माळवदे , सदस्य दिलीप तळेकर , जिल्हा परिषदेचे सदस्य रविंद्र जठार , तरेळे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच शेर्पे केंद्रातील शिडवणे , चिंचवली, शेर्पे, कुरंगवणे या गावांमधील ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. सर्व शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ यांचे पदाधिकारीदेखील या महोत्सवाला भेट देऊन मुलांना प्रोत्साहन देणार आहेत.
गुरुवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता उदघाटन समारंभ संपन्न होईल. त्यानंतर लहान व मोठ्या गटाचे सर्व मैदानी सांघिक सामने व वैयक्तिक खेळ होणार आहेत. शुक्रवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजल्यापासून दुसऱ्या दिवसाच्या उर्वरित बौद्धिक व सांस्कृतिक स्पर्धा पार पडतील. त्यामध्ये ज्ञानी मी होणार , समूहगीत, समूहनृत्य इत्यादी स्पर्धा होतील. तसेच बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल. तरी सर्व पालकांनी व क्रीडाप्रेमींनी आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शेर्पे केंद्राचे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, क्रीडाप्रमुख गोविंद वावदाने , मुख्याध्यापक सुनील तांबे, शेर्पे केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन समिती शिडवणेचे अध्यक्ष दिनेश रांबाडे यांनी शेर्पे केंद्राच्या वतीने केले आहे.

No comments:
Post a Comment