Tuesday, December 3, 2019

प्लास्टिकला पर्याय शोधून निसर्गातील वस्तूंचा वापर करा : सुजाता हळदिवे

हरकुळ : दिनांक ३ डिसेंबर २०१९ :
          कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन व शुभारंभ लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय , हरकुळ बुद्रुक येथे मंगळवारी संपन्न झाले. त्यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि कणकवली तालुका पंचायत समितीच्या सभापती सुजाता हळदिवे यांनी वरील उद्गार काढले. त्या म्हणाल्या , निसर्गातून विज्ञानाच्या आधारे विकास होत असतो, आपण तो विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांचा वापर करून साध्य  करावा.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक कणकवलीचे गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांनी केले. ते म्हणाले , भविष्यकाळ हा विज्ञानाच्या हातात असतो. प्रदर्शनाच्या उदघाटक म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत उपस्थित होत्या. विज्ञानाचा वापर आपण आपल्या प्रगतीसाठी केला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले. उपसभापती सुचिता दळवी म्हणाल्या कि विद्यार्थ्यांनी विज्ञान समजून घेऊन पुढे जावे. हरकुळ बुद्रुकच्या सरपंच गौसिया पटेल म्हणाल्या कि विज्ञानाद्वारे आपण फार मोठा टप्पा पार पाडला आहे. विज्ञानाचा जीवनात सकारात्मक वापर करण्याचा अनमोल सल्ला त्यांनी दिला.माजी शिक्षण व उपसभापती बाबासाहेब वर्देकर म्हणाले कि संशोधक तयार करण्याचे सामर्थ्य आजच्या शिक्षकांमध्ये आहे.
          कार्यक्रमाला श्रिया सावंत, दिव्या पेडणेकर, मिलिंद मेस्त्री , शालेय समिती अध्यक्ष ओमप्रकाश ताम्हाणेकर , पोलीस पाटील संतोष तांबे , शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , शिक्षण विस्तार अधिकारी किशोर गवस , सर्व केंद्रप्रमुख , सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी , विज्ञान शिक्षक , मुख्याध्यापक व विद्यार्थी स्पर्धक उपस्थित होते.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेवाळकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन आर वाय पाटील यांनी केले. ३ ते ५ असे तीन दिवस चालणाऱ्या या विज्ञान मेळाव्यासाठी सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या चहापानाची व दुपारच्या भोजनाची सोय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व पालकांनी केले आहे. प्रदर्शनात बहुतांशी शाळांच्या सहभागाबद्दल संयोजकांनी आनंद व्यक्त केला.
            

No comments:

Post a Comment