शिडवणे : दिनांक : ७ ऑगस्ट २०२१ ( महेंद्र टक्के )
दरवर्षी शिडवणे माऊली वारकरी सांप्रदाय मंडळाकडून आपत्तीग्रस्तांना साहाय्य दिले जाते. यंदाही त्यांनी आपत्तीग्रस्तांना सढळ हस्ते मदत करण्याची आपली परंपरा जोपासली आहे.
चिपळूण येथील १०० पूरग्रस्तांना मंडळाच्या वतीने १०० चटया व १०० ब्लँकेट्स देऊन वस्तुरूपाने मंडळाच्या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रत्यक्ष वितरण करण्यात आले. त्यावेळी सचिव उमेश अंकुश मेस्त्री, खजिनदार सिताराम (बाबा) भिवा टक्के , कार्याध्यक्ष महेंद्र प्रभाकर टक्के , सल्लागार रजनीकांत शशिकांत चव्हाण, सदस्य सखाराम पांडुरंग पाटणकर ,अशोक धोंडू पाष्टे , यशवंत धाकु नामये , गुरूनाथ धोंडू भिसे , शशिकांत विठोबा गुंडये , प्रथमेश गणेश टक्के , अक्षय सिताराम टक्के आणि डॉ. संजय बंडू कोकाटे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. कोविड नियमावलीचे पालन करुन जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. पूरग्रस्तांनी शिडवणे माऊली सांप्रदाय मंडळाचे विशेष आभार मानले आहेत.


























No comments:
Post a Comment