Friday, February 18, 2022

शिक्षकहो , इंग्रजी पेटीचा दररोज वापर करा : सदगुरु कुबल

 शेर्पे व खारेपाटण इंग्रजी पेटी प्रशिक्षण दुसरा टप्पा 

कुरंगवणे : दिनांक 18 फेब्रुवारी 22




          सध्या इंग्रजी आकलनयुक्त शिकणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी शासनाचे इंग्रजी पेटी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षकांनी  वर्गपातळीवर दररोज इंग्रजी पेटीचा नियोजनपूर्वक वापर करावा असे प्रतिपादन शेर्पे खारेपाटण या दोन्ही केंद्रांचे केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल यांनी कुरंगवणे पश्चिम शाळेत केले. 

          त्यावेळी उदघाटन समारंभासाठी खारेपाटण केंद्रमुख्याध्यापक प्रदिप श्रावणकर , कुरंगवणे भंडारचे मुख्याध्यापक सखाराम खरात , कुरंगवणे खैराटचे मुख्याध्यापक बागडी , खारेपाटण उर्दूचे मुख्याध्यापक रुबाब फकिर , प्रभा अकिवाटे , स्मिता कोरगावकर , कुरंगवणे उपसरपंच संतोष ब्रम्हदंडे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद गाडे , उपाध्यक्षा अरुणा ब्रम्हदंडे , श्रद्धा सुतार , भाग्यश्री सुतार , ग्रामपंचायत सदस्या रेणुका पवार , सुरेखा सुतार , पूर्वा लाड , समीक्षा गाडे , भालचंद्र सुतार , विकास उन्हाळकर , साक्षी करंगुटकर , मयुरी लाड , रसिका लाड , शीतल लाड , अपर्व करंगुटकर , प्रमोद लाड आणि सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते. कुरंगवणे पश्चिम शाळेचे मुख्याध्यापक आशिष दुधे यांनी सर्व उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

          तज्ज्ञमार्गदर्शक म्हणून आशिष दुधे आणि आसिफ सय्यद यांनी इंग्रजी पेटीचे साभिनय मार्गदर्शन केले. त्यात प्रशिक्षणार्थी शिक्षकांचा सहभाग घेण्यात आला. त्यामध्ये त्यांनी एकूण चोवीस पेक्षा जास्त उपक्रम प्रत्यक्ष करुन दाखवले. कृती करुन दाखवली व कृती करुन घेतली.

          कुरंगवणे पश्चिम शाळेचे उपशिक्षक सुनिल खांडेकर यांनी सूत्रसंचालन केले व मुख्याध्यापक आशिष दुधे यांनी सर्वांचे आभार मानले.खारेपाटण केंद्रशाळेचे केंद्रमुख्याध्यापक प्रदिप श्रावणकर यांनी कुरंगवणे पश्चिमच्या विद्यार्थ्यांना रोख स्वरुपात देणगी दिली.  


































       





















































No comments:

Post a Comment