🛑 5 जूनचा उपक्रम : गोष्टींचा तास
आजच्या उपक्रमाला सन्माननीय सरपंच रविंद्रजी शेट्ये साहेब सुरुवातीपासून उपस्थित होते.त्यांनी मुलांकडून विविध विषयांवर आधारित माहिती विचारून घेतली.प्रश्न विचारले. तसेच शालेय शिक्षणात आवश्यक असणारी , विविध महान विभूती यांच्याविषयी माहिती सांगितली. तसेच शालेय परिसरात असणाऱ्या विविध नेत्यांच्या प्रतिमांविषयी , त्यांच्या महनीय कार्याविषयी मुलांना माहिती व्हावी यासाठी विशेष लक्ष देवून मुलांना मार्गदर्शन करावे असे सांगितले. मुलांकडून गोष्टी सांगून घेतल्या. उपशिक्षिका सीमा वरुणकर मॅडम यांनी मुलांना " मातृ पितृ देवो भव " ही संस्कारकथा सांगून उपक्रमाची सांगता केली. उपस्थितांचे आभार मानून मुलांना घरी सोडण्यात आले.










No comments:
Post a Comment