शिडवणे : दिनांक : ०८ ऑक्टोबर २०१९ :
विजयादशमीच्या दिवशी सर्व शाळांना सुट्टी होती. शाळा बंद असताना आलेला पाऊस शिडवणे कोनेवाडी शाळेचे बरेच नुकसान करणारा ठरला. दुपारी २ वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सलग तीन तास पडलेल्या पावसाने शिडवणे गावाला अक्षरशः झोडपून काढले असे म्हणायला हरकत नाही. या भीषण वादळी पावसामुळे शिडवणे कोनेवाडी शाळेच्या दोन इमारतींची सुमारे ६०० कौले , ३५ पेक्षा जास्त कोने उडून जाऊन नुकसान झाले आहे.
एका इमारतीच्या खिडक्यांची झडपे मोडून पडली आहेत. स्वच्छतागृहाचे १० पत्रे तुटले आहेत. शेजारील झाडाचा बुंधा शाळेच्या दगडी कुंपणावर पडून नुकसान झाले आहे. लाईट मीटरची सर्व्हिस वायर तुटली आहे. असे एकूण सुमारे ५०,००० रुपयांचे नुकसान झाले असण्याची.शक्यता आहे.
सध्या सदर नुकसानग्रस्त इमारत मुलांना बसण्यासाठी धोकादायक झालेली आहे. सुट्टी असल्याने मुलांच्या जीविताला धोका झालेला नाही. पण यापुढे दुरुस्ती झाल्याशिवाय त्यामध्ये बसणे म्हणजे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखेच आहे. यासंदर्भात तलाठी आणि पोलीसपाटील यांनी पंचयादी घातली आहे. तरीही झालेल्या नुकसानीची भरपाई शासन यंत्रणेकडून लवकरात लवकर मिळण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ , माता पालक संघ , ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांच्याकडून कळकळीची मागणी होत आहे.

No comments:
Post a Comment