‘ कलांकुर ’ ठरला अभ्यासपुरक उपक्रम : भाई चव्हाण
महिला आघाडी शिक्षक समिती कणकवलीने राबविले जागतिक महिला दिन विशेष पर्व
कणकवली दिनांक : 17 मार्च 2021
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने नेहमीच विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. कोरोना कालावधीत खजिना कथांचा , देशभकतीपर गीतगायन इत्यादी उपक्रम राबवून यु ट्युबच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षकांना ऑनलाईन अध्यापन व अध्ययन पुरक साहित्य पुरविण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक समिती सातत्याने करताना दिसत आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन महिला आघाडीने कलांकुर नावाचा नवा उपक्रम राबवला असून तो अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलेला आहे , असे उद्गार शिक्षक समितीचे नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष भाई चव्हाण यांनी उपक्रमाच्या सांगता सोहळ्यात काढले.
कोविड 19 च्या कालावधीत विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील आनंददायी शिक्षण प्रक्रिया निरंतर चालू राहण्याकरीता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कला , कार्यानुभव या विषयांवर आधारित यु ट्युब वाहिणीद्वारे ‘ कलांकूर ’ या एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन 8 मार्च ते 15 मार्च 2021 या कालावधीत करण्यात आले होते. त्यात स्नेहा सतीश सामंत, मोहिनी सत्यवान कुडतरकर, स्नेहा शशिकांत गोठणकर, मीनल दिलीप खानोलकर, सुप्रिया संतोष महाजन, श्रेया श्रीकृष्ण ठाणेकर, स्वाती यशवंत लाड, स्नेहा संजय काणेकर, शामल मंगेश तळदेवकर, सुजाता सुनिल टिकले, पुजा पराग मुंडले, इंदु मनोहर डगरे या महिला शिक्षक भगिनींनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.
या उपक्रमासाठी शिक्षकनेते गिल्बर्ट फर्नांडीस, तालुकाध्यक्ष विनायक जाधव, तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज, महिला आघाडी तालुकाध्यक्षा निकिता ठाकूर, महिला आघाडी सरचिटणीस नेहा मोरे यांची प्रेरणा मिळाली. महिला कार्यकारिणी सल्लागार सुजाता टिकले, कल्पना मलये, प्रणाली निकम, स्वप्नाली रावराणे, वृषाली सावंत, स्वराशा कासले यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमासाठी सारिका देवू पवार यांनी तंत्रसहाय्य केले. सर्व व्हिडिओंमध्ये महिलांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ आकर्षक वस्तू बनवण्यासाठी सहजसोपे मार्गदर्शन केले आहे. अभ्यासविषयक उपक्रम राबविल्याबद्दल महिला आघाडीचे तालुका शिक्षक समितीच्या वतीने सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment