तळेरे प्रभागस्तरीय गुणगौरव समारंभ २०२१
शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांच्या सौजन्याने सन्मानपत्र व सन्मानचिन्हांचे वितरण
तळेरे : दिनांक २० मार्च २०२१ ( प्रवीण कुबल )
आदर्श शाळा तळेरे नं . १ येथे ' तळेरे प्रभागस्तरीय गुणगौरव समारंभ सन २०२० - २०२१ ' चे आयोजन ' करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन कणकवली तालुका पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर म्हणाले , " तळेरे प्रभागातील सर्व शिक्षक विविध शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत. त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल , संजय पवार हे स्वतः उपक्रमशील आहेत. त्यांनी कोविड कालावधीत ' शिक्षण आपल्या दारी ' या कणकवली पंचायत समितीच्या उपक्रमांतर्गत विशेष मेहनत घेऊन शाळा बंद असली तरी शिक्षण सुरू ठेवले होते. सर्व शिक्षकांनीही विद्यार्थी हित लक्षात घेऊन अध्यापनाचे कार्य केले होते. शाळा सुरु झाल्यानंतर ' माझी शाळा , माझा किल्ला ' या नवोपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे ही उल्लेखनीय बाब आहे. शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गही सुरु आहेत. यामधूनच आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी पुढे UPSC / MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांना बसावा व अधिकारी होऊन आपल्या जिल्ह्यात यावा अशी इच्छा माजी सभापती दिलीप तळेकर यांनी व्यक्त केली.
त्यावेळी व्यासपीठावर तळेरे सरपंच साक्षी सुर्वे , उपसरपंच दिनेश मुद्रस, तळेरे बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , शेर्पे व खारेपाटण केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल , कासार्डे व साळिस्ते केंद्रप्रमुख संजय पवार , शिक्षणप्रेमी प्रवीण पाताडे, बीट मुख्याध्यापिका करंदीकर उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये ४० शिक्षकांचा सन्मानचिन्ह , सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. पटनोंदणी पुरस्कारप्राप्त शिक्षक , माझी शाळा माझा किल्ला स्पर्धेत प्रथम, द्वितीय , तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले. नवोदय व शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना सोनाटाचे सोनेरी मनगटी घड्याळ भेट देण्यात आले. उमेद फाऊंडेशन च्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख करुन त्यांना धन्यवाद दिले. सेवानिवृत्त शिक्षक , योगशिक्षक , उत्तम निवेदक , उत्तम अभिलेखे ठेवणारे मुख्याध्यापक , उपक्रमशील मुख्याध्यापक , उपक्रमशील पदवीधर शिक्षक , टॕग समन्वयक, उपक्रमशील शिक्षक , जिल्हास्तरावर क्रीडा स्पर्धेत सहभागी शाळा, सेंद्रिय शेती व परसबागेत विशेष कार्य करणाऱ्या शाळा यांचाही मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास पाताडे यांनी केले. सुत्रसंचालन श्रीराम विभुते तर आभार प्रदर्शन जान्हवी परब यांनी केले. सद्गुरु कुबल , संजय पवार , सावंतबाई , साक्षी घाडीगांवकर यांनी मनोगते व्यक्त केली. खारेपाटण नं. १ शाळेची तालुक्यातील अत्युत्कृष्ट शाळा म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रभागातील शिक्षकवृंद उपस्थित होते. कोविड नियमावलीचे पालन करुन समारंभ संपन्न झाला. सन्मानचिन्ह , प्रमाणपत्रे व पारितोषिक भेटींचे प्रायोजक तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे हे स्वतः असल्याबद्दल प्रभागाच्या वतीने त्यांना धन्यवाद देऊन सत्कार करण्यात आला. एवढया चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्व मान्यवर व शिक्षकवृंद यांनी आयोजकांचे कौतुक केले.




























































No comments:
Post a Comment