Sunday, March 7, 2021

समितीच्या पाईकांनो , शिक्षक बँकेत आपले पॕनलच निवडून आणा : आनंद तांबे




कणकवली तालुका शिक्षक समिती कार्यकारिणी सभेत केले आवाहन


 कणकवली दिनांक : ७ मार्च २०२१


          नुकतीच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका कणकवली कार्यकारिणी सभा कनेडी बाजारपेठ शाळेत संपन्न झाली. कणकवली शिक्षक बँकेचे संचालक आनंद तांबे यांनी शिक्षक बँकेबाबत सविस्तर आकडेवारी सांगितली. विविध योजना सांगितल्या. त्यावेळी मार्गदर्शन करताना आनंद तांबे म्हणाले , " आपल्या शिक्षकबँकेतील पॕनलला बहुमताने निवडून आणणे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे , तुम्ही यावेळी कणकवलीसाठी अधिक जोमाने व एकजुटीने काम केल्यास आपला विजय निश्चित आहे. " 

          सभेमध्ये सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी सर्वांचे शाब्दिक स्वागत केले.मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर शिक्षकनेते गिल्बर्ट फर्नांडिस , तालुकाध्यक्ष विनायक जाधव , कार्याध्यक्ष मणेरीकर , शिक्षक बँक संचालक आनंद तांबे , केंद्रप्रमुख अडुळकर , महिलाध्यक्षा निकिता ठाकूर , महिला सरचिटणीस नेहा मोरे उपस्थित होते.जिल्हा पदाधिकारी महेंद्र पवार , अजय तांबे, संतोष कुडाळकर यांचेही स्वागत करण्यात आले. कै. उमा महेश काणेकर स्मरणार्थ पुरस्कारप्राप्त उपक्रमशील शिक्षिका कल्पना मलये यांचेही गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. कनेडी बाजारपेठ शाळेच्या मुख्याध्यपिका माधवी राणे व उपशिक्षिका विद्या परब यांचे स्वागत करण्यात आले.सचिव सुशांत मर्गज यांनी मागील सभेचे इतिवृत्त सविस्तर वाचून दाखवले. इतिवृत्तास सर्वांनी मंजुरी दिली. 

          तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी तालुका संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. नवांकुर या महिला सेलच्या उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हा सभेत घडलेल्या माहितीचे सादरीकरण केले. समितीचा DCPS च्या त्रुटी पूर्ण होत नाही तोपर्यंत NPS ला अजूनही विरोधच आहे. तसेच DCPS च्या त्रुटी पूर्ण करण्याबाबतही वारंवार संघटनात्मक पाठपुरावा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.जुन्या पेन्शन योजनेसाठी संघटनेचा आग्रह कायमच असणार आहे असेही त्यांनी सांगितले. 

          वेतन निश्चिती व चट्टोपाध्याय वेतन संदर्भात शिक्षकनेते गिल्बर्ट फर्नांडिस आणि श्रीकृष्ण कांबळी यांच्या विशेष प्रयत्नांबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात आले.मेडिकल बिले पेंडिंग नसल्याचेही त्यांनी सांगितले. लवकरच २८ चटोपाध्याय धारक शिक्षकांचे विकल्प भरुन घेण्यात येतील असे सांगण्यात आले. समितीचे शिलेदार समितीला नियमितपणे आर्थिक सहाय्य देतात याबद्दल तालुकाध्यक्ष यांनी सर्वांचे विशेष आभार मानले. विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव समारंभ २४ एप्रिल रोजी करण्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आले. सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी सर्वांचे आभार मानले.  सभेला बहुसंख्य शिक्षक सभासद उपस्थित होते.



©️ प्रवीण अशितोष कुबल , प्रसिद्धी प्रमुख

No comments:

Post a Comment