🔹 केंद्रप्रमुख संजय पवार यांचा नडगीवे नं. 1 येथे हृद्य सत्कार
नडगीवे : शेर्पे, खारेपाटण आणि कासार्डे केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून यशस्वीपणे धुरा सांभाळलेले सन्माननीय संजय पवार यांची नुकतीच कणकवली केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात शेर्पे आणि खारेपाटण केंद्रातील सर्व मुख्याध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते, त्यांनी पवार साहेबांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सत्कार समारंभात शिडवणे नं. 1 शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी संजय पवार साहेबांना 'फोर एग्रीमेंट्स' (The Four Agreements) हे प्रेरणादायी पुस्तक सप्रेम भेट दिले. पवार साहेब हे आपल्या कार्यकाळात शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहिले आहेत. त्यांच्या कणकवली येथील नव्या नियुक्तीमुळे या भागातील शैक्षणिक प्रगतीला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सध्या संजय पवार यांच्याकडे चार केंद्रांचा कार्यभार आहे.
यावेळी उपस्थित सर्व मुख्याध्यापकांनी संजय पवार साहेब यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



No comments:
Post a Comment