साळीस्ते : दिनांक १९ फेब्रुवारी २०२० :
सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा हे सर्वांसाठीच अतिशय आकर्षणाचा भाग झालेल्या आहेत. आपल्या मुलांना इंग्रजीतून शिक्षण मिळावे हा पालकांचा हेतू असतो. म्हणूनच बरेच आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दाखल करतात. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदांच्या शाळांमधूनही आता सेमी इंग्रजीतून शिक्षण देऊन प्राथमिक शिक्षक उत्तम कामगिरी बजावत आहेत. त्यासाठी टॅग मिटिंगच्या द्वारे इंग्रजी शिकविणाऱ्या शिक्षकांच्या संभाषण सभा संपन्न होत आहेत. या मिटिंगचा फायदा शिक्षकांचा इंग्रजीबद्दलचा आत्मविश्वास अधिक दृढ होण्यास मदतच होत आहे. टाटा ट्रस्ट आणि ब्रिटिश कौन्सिल यांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या टॅग मिटिंगचा दर्जा उच्च असून शिक्षकांचे इंग्रजीचे ज्ञान समृद्ध होताना दिसत असल्याचे मत तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनी साळीस्ते- शेर्पे अंतगत झालेल्या दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या टॅग मिटिंगमध्ये व्यक्त केले.
त्यावेळी शेर्पे- साळीस्ते केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल म्हणाले, सर्व शिक्षक या टॅग मिटींगला आवर्जून उपस्थित राहून लाभ घेत आहेत. सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन इंग्रजीतून संभाषण करत आहेत ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानस्पद गोष्ट आहे. जिल्हा परिषद शाळांमधील इंग्रजीमय वातावरण आपल्या शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी सहाय्य्यभुत ठरणार आहे.
टॅग समन्वयक गोविंद वावदाने यांनी उत्कृष्ट संभाषणाने सर्व शिक्षकांना इंग्रजी बोलण्यास उद्युक्त केले. सर्वांना गमतीदार, सहज सुंदर उपक्रमांमध्ये सामील करून घेत हसत खेळत इंग्रजीचे संभाषण घडवून आणले. इंग्रजी लेखन कसे घ्यावे , लेखन कसे तपासावे यासाठी मार्गदर्शन केले. साळीस्ते आणि शेर्पे केंद्रातील सर्व शाळांमधील इंग्रजीचे शिक्षक सदर टॅग मिटींगला उपस्थित होते. सर्व टॅग शिक्षकांनी गेल्यावर्षीच्या बुकलेट्स पूर्ण करून समन्वयकांकडे जमा केल्या. नवीन पुस्तिका देण्यात आल्या. या द्वारे दुसऱ्या वर्षीही दरमहा अशा प्रकारच्या टॅग मिटींगा घेतल्या जाणार असून प्राथमिक शिक्षकांचे इंग्रजीचे संभाषण अधिकतम समृद्ध केले जाणार असल्याने मराठी शाळांमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदांच्या शाळेत दाखल केल्यास मुलांच्या मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषा चांगल्या तयार होणार आहेत.
उपस्थित अधिकाऱ्यांचे इंग्रजीतून स्वागत करताना दोडमनीसर
प्रभाग विस्तार अधिकारी मा. सुहास पाताडेसाहेब यांचे बुके देऊन स्वागत करताना अमोल भंडारीसर
मा. सद्गुरू कुबल ( केंद्रप्रमुख शेर्पे- साळीस्ते ) यांचे स्वागत करताना ब्रम्हदंडेसर

No comments:
Post a Comment