कणकवली : दिनांक : ०१/०३/२०२० :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक संघटना अतिशय जोमाने कार्य करीत असून १० फेब्रुवारी रोजी कणकवलीत संपन्न झालेला वधू वर मेळावा हे संघटनेच्या एकीचे प्रतिक आहे असे गौरवोद्गार जिल्हा नाभिक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. कणकवलीतील सर्व स्वयंसेवकांनी केलेली मेहनत आणि जिल्हा नाभिकवासियांनी केलेले प्रासंगिक दौरे भरीव कार्य करणारे ठरले असे मनोगत जिल्हाध्यक्ष नाभिकरत्न अनिल अणावकर यांनी परमहंस भालचंद्र भक्त निवासात आयोजित ' नाभिकांच्या सन्मान सोहळ्यात ' व्यक्त केले.
जिल्हा नाभिक मेळावा उत्कृष्ट संपन्न केल्याबद्दल परिश्रमपूर्वक कार्य केलेल्या सर्व नाभिक बांधवांचा, स्वयंसेवकांचा सन्मान सोहळा कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण , कणकवली तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत चव्हाण , जिल्हा सचिव सुधीर चव्हाण , निवृत्त मुख्याध्यापक दिगंबर चव्हाण, निवृत्त केंद्रप्रमुख दत्तात्रय चव्हाण , उपाध्यक्ष विठोबा चव्हाण , चंद्रकांत चव्हाण , जिल्हा महिला अध्यक्षा प्रतिभा चव्हाण , कणकवली महिला अध्यक्षा संजना चव्हाण ,कुडाळ अध्यक्ष नितेश पिंगुळकर , कुडाळ महिला अध्यक्षा विद्या चव्हाण , रुपेश पिंगुळकर, अनिल चव्हाण , किशोर लाड, जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण, जिल्हा सल्लागार सुभाष चव्हाण , सहसचिव हेमांगी अणावकर , महिला सचिव ईश्वरी कुबल उपस्थित होते. कणकवली तालुक्यातील ७० पेक्षा जास्त स्वयंसेवकांचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते जाहीर सन्मान करण्यात आला.
सन्मान झालेल्या स्वयंसेवकांनी आपापली मनोगते व्यक्त केली. निलेश चव्हाण, संजना चव्हाण, नाभिकरत्न विलास चव्हाण, चंद्रशेखर चव्हाण, दत्तात्रय चव्हाण , दिगंबर चव्हाण, प्रतिभा चव्हाण , विद्या चव्हाण, किशोर लाड, विठोबा चव्हाण , अनिल चव्हाण, सुधीर चव्हाण, नितेश पिंगुळकर, नंदकुमार चव्हाण, नाभिकरत्न शरद लाड, कणकवली उपाध्यक्षा प्रिया चव्हाण यांनी मेळाव्याबद्दलची सकारात्मक मते मांडली.
रचना राजन चव्हाण यांची जिल्हा संघटनेमध्ये महिला कार्यकारिणी सदस्या म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. संपदा मंगेश चव्हाण यांना ' नाभिक हिरकणी ' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कणकवली तालुका सचिव प्रवीण कुबल यांनी केले. आभार जिल्हा सचिव सुधीर चव्हाण यांनी मानले.

No comments:
Post a Comment