तळेरे : दिनांक : २८ फेब्रुवारी २०२० :
समग्र शिक्षा राष्ट्रीय आविष्कार योजनेंतर्गत कणकवली तालुक्यातील ९ शाळांमधील ११८ अभ्यासू मुलांचा अभ्यास दौरा नुकताच पार पडला. त्यामध्ये चिंचवली मधली , शिडवणे नं. १ , तळेरे नं. १, लोरे नं. १ , कासार्डे देऊळकरवाडी, कणकवली नं. ३ , दिगवळे नं. १, वागदे नं. १ आणि जानवली मारुतीमंदिर या शाळांची निवड झाली होती. सदर शाळांमधील प्रत्येकी अभ्यासू १२ विद्यार्थ्यांना यात लाभ देण्यात आला. शासनाकडून प्रत्येक शाळेला २००० रुपये अनुदान देण्यात आले.
राधानगरी धरण ( लक्ष्मी तलाव ) , काळंबावाडी, एक आदर्श ज्ञानरचनावादी प्राथमिक शाळा बोरवडे , बिद्री साखर कारखाना, ऊसाचे गुऱ्हाळ , आदमापूर बाळूमामा मंदिर, दाजीपूर ( अभयारण्य ) अशा प्रकारची ऐतिहासिक, शैक्षणिक व भौगोलिक स्थळे दाखवण्यात आली. त्यावेळी ९ शाळांच्या सर्व मुलांनी अत्यंत आनंदाने हा शैक्षणिक अभ्यास दौरा पूर्ण केला असून जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या उपक्रमाबद्दल आभार मानले आहेत. अभ्यास दौऱ्यामध्ये शेर्पे साळीस्ते केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, सर्व शिक्षा अभियानचे सचिन तांबे , स्वप्नाली बेळणेकर , अनिल खोत, जगदीश गोसावी, संतोष माने, सुनिल तांबे, कृष्णा सावंत , प्रतिभा कोतवाल , अपूर्वा सावंत आणि चंद्रलेखा नाईक यांनी सहभाग घेतला होता.
या दौऱ्यामध्ये सर्व मुलांनी मुलाखत, चर्चा, नोंदवही इत्यादींच्या माध्यमातून माहितीचे संकलन करून अभ्यास दौरा खऱ्या अर्थाने यशस्वी केला. या योजनेंतर्गत सहलीचा लाभ दिल्याबद्दल सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी शासनाचे आभार मानले आहेत.

No comments:
Post a Comment