चिंचवली : दिनांक : १० ऑक्टोबर २०१९ :
शेर्पे केंद्राची ऑक्टोबर महिन्यातील शिक्षण परिषद चिंचवली मधली या शाळेत अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. त्यावेळी शेर्पे केंद्राचे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, केंद्रमुख्याध्यापक दशरथ शिंगारे आणि केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
शिक्षण परिषद म्हणजेच पूर्वीचे गटसंमेलन होय. पण आता त्यामध्ये आमुलाग्र बदल घडून आलेला आहे. जिल्हा विद्या प्राधिकरणाच्या वतीने नियोजित विषयांवर आताच्या शिक्षण परिषदांमध्ये मार्गदर्शन केले जाते. केंद्रातील शिक्षक किंवा विषयतज्ज्ञ यांचेही मार्गदर्शन ठेवले जाते. त्या त्या विषयांमध्ये पारंगत असलेल्या तज्ज्ञांना बोलावून माहिती देण्यात येते. विशेषतः यामध्ये नवीन शैक्षणिक साधनांचा प्रामुख्याने वापर केलेला असतो.
चिंचवली मधली शाळेच्या पदवीधर शिक्षिका प्रभा प्रकाश आकिवटे यांनी अध्ययन स्तर निश्चिती व कृती आराखडा यावर सखोल असे मार्गदर्शन केले. इयत्ता २ री ते ८ वी पर्यंतच्या मुलांचा स्तर निश्चिती कसा करावा व स्तर निश्चित केल्यानंतर मागील स्तरावर असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रगत स्तरावर नेण्यासाठी स्तर निश्चित करण्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अरुणा रंगराव वाळवेकर यांनी अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्न निर्मिती कशी करावी, या विषयावर गट पाडून प्रात्यक्षिक रूपाने कार्यशाळा घेतली. त्या कार्यशाळेत सर्व उपस्थित शिक्षकांनी सहभाग घेऊन विविध प्रकारचे प्रश्न तयार करून ते गटाने सादर केले. चिंचवली मधली शाळेतील सर्व शिक्षक यांनी शिक्षण परिषदेचे उत्तम प्रकारचे आयोजन करून सर्वांचे हसतमुखाने स्वागत केले. केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांनी शैक्षणिक व प्रशासकीय मार्गदर्शन केले. शालेय पोषण आहार पाककृती , क्रीडा स्पर्धा नियोजन, गणित सुधार उपक्रम, समाजशास्त्र कार्यशाळा, अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, तंबाखूमुक्त शाळा , अब्दुल कलाम परीक्षा, शाळा दुरुस्ती प्रस्ताव आणि विविध शैक्षणिक उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली.

एकदम छान वृत्ताकंन
ReplyDelete
Deleteधन्यवाद
Very nice reporting sir.
ReplyDeleteThanks for inspiring me
ReplyDeleteVery nice sir
ReplyDeleteThanks Sirji
ReplyDelete