Saturday, April 26, 2025

'नाभिकायन' बुकलेटचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

 * प्रवीण अशितोष कुबल यांच्या 'नाभिकायन' या ब्लॉगस्पॉटवरील निवडक लेखांच्या बुकलेटचे प्रकाशन शुक्रवार, २५ एप्रिल २०२५ रोजी संत सेना महाराजांच्या जयंती कार्यक्रमात कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते झाले.

 * या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे नेते अनिल अणावकर, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण, संत सेना महाराज पतसंस्थेचे चेअरमन भाऊ चव्हाण, शंकर पिंगुळकर, शंकर चव्हाण, कणकवली तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण, तेजस्विनी कुबल, कार्याध्यक्ष संजय कुबल, प्रिया चव्हाण, उपाध्यक्ष निलेश चव्हाण आणि नाभिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 * याच दिवशी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या विस्तृत कार्यकारणीच्या सभेत मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या बुकलेटचे प्रकाशन झाले.

 * शेर्पे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये 'या लाडक्या मुलांनो' या लहान मुलांच्या जीवनावरील लेखांच्या बुकलेटचे प्रकाशन केंद्रप्रमुख संजय पवार यांच्या हस्ते झाले होते.













No comments:

Post a Comment