Thursday, May 1, 2025

शिडवणे नं. 1 शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा!

 शिडवणे नं. 1 शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा!

शिडवणे नं. 1 शाळेत आज, महाराष्ट्र दिनाच्या शुभदिनी, इयत्ता 1 ली ते 7 वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रगतीपत्रक वितरण करण्यात आले. यासोबतच, विद्यार्थ्यांचे चावडी वाचन घेण्यात आले, ज्यामध्ये मुलांनी वर्षभर केलेल्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा सर्वांसमोर सादर केला. यापूर्वी शाळेत दोन वेळा चावडी वाचन उपक्रम यशस्वीरित्या पार पडला आहे आणि त्यावेळी गावांतील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. आज शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संचिता टक्के, पोलीस पाटील समीर कुडतरकर, अन्वी येतकर, प्रियांका कासार्डेकर, बापू टक्के, प्रियांका पाटणकर बाई, केतकर बाई, सीमा वरुणकर मॅडम, शालेय पोषण आहार ताई समिता सुतार मॅडम आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. 

आपल्या शाळेने 'निपुण शाळा' म्हणून शासनाकडे नोंदणी केली आहे, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. आजच्याच दिवशी, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी, पटनोंदणी सर्वेक्षणानुसार इयत्ता पहिलीमध्ये चार नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. आता शाळेची एकूण पटसंख्या 49 झाली आहे.

नवीन शैक्षणिक वर्षात कोणत्याही इयत्तेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी कृपया मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा.

मागील शैक्षणिक वर्षात उत्तम यश मिळवून पुढील वर्गात प्रवेश केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, शिक्षणप्रेमी सर्व ग्रामस्थ, पालक आणि सन्माननीय पदाधिकारी, शिक्षकवृंद यांच्या वतीने सर्वांचे हार्दिक अभिनंदन!

आपले नम्र,

मुख्याध्यापक

शाळा शिडवणे नं. 1























No comments:

Post a Comment