Tuesday, July 22, 2025

सिंधुदुर्ग जिल्हा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा: गुणवंतांचा गौरव, पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार!

🔴 सिंधुदुर्ग जिल्हा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा: गुणवंतांचा गौरव, पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार!

कणकवली: युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार सोहळा येत्या रविवार, २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १०:३० वा. कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांच्या शुभहस्ते हा गौरव सोहळा संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात तळेरे केंद्रातून खालील विद्यार्थी, त्यांचे पालक आणि संबंधित शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे:

 * अन्वित संतोष पाटील (शाळा तळेरे नं. १)

 * ज्ञानेश नितीन पाटील (शाळा तळेरे नं. १)

 * ज्ञानदा नितीन पाटील (शाळा तळेरे नं. १)

 * रिद्धी राजेश जाधव (शाळा तळेरे नं. १)

 * अन्वित विश्वनाथ चव्हाण (शाळा वारगाव नं. ३)

 * मंदार जीवदास जाधव (शाळा कासार्डे बौद्धवाडी)

 * रेवळ अनंत राऊळ (एस. एम. विद्यालय, खारेपाटण)

 * चैतन्य मनोज गव्हाणकर (शाळा लोरे नं. १)

तळेरे केंद्र संचालकांनी या सर्व विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना विनंती केली आहे की, त्यांनी या सत्कार समारंभाला वेळेत उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी. या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव केला जाईल आणि त्यांना पुढील वाटचालीस प्रेरणा मिळेल.




No comments:

Post a Comment