Monday, January 13, 2020

तळेरे प्रभाग स्तरावर ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग संपन्न

तळेरे : दिनांक : १३ जानेवारी २०२० :
          तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांच्या संकल्पनेतून ५ वी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तळेरे महाविद्यालयाच्या डॉ. एम. डी . देसाई सांस्कृतिक भवनात प्राचार्य चंद्रकांत कृष्णाजी कोरे , शालेय समितीचे अध्यक्ष अरविंद महाडिक , शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , शेर्पे- साळीस्ते केंद्रप्रमुख सदगुरू कुबल, कासार्डे केंद्रप्रमुख संजय पवार, खारेपाटण केंद्रप्रमुख नारायण ओटवकर आणि प्रभागातील शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
          अमोल भंडारी यांनी मराठी व गणित या दोन विषयांचे मार्गदर्शन केले. जान्हवी परब यांनी इंग्रजी या विषयाचे मार्गदर्शन केले. बालाजी फड यांनी बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचे मार्गदर्शन केले. सदरच्या  मार्गदर्शन वर्गाचा लाभ तळेरे प्रभागातील बहुसंख्य शाळांमधील विद्यार्थ्यांनी घेतला. तसेच शाळेतील शिक्षकांनाही या वर्गाचे मार्गदर्शन लाभले. एक उत्तम असा मार्गदर्शन वर्ग आयोजित केल्याबद्दल तळेरे प्रभागातील शिक्षणप्रेमी पालकांनी शिक्षण विस्तार अधिकारी आणि त्यांच्या केंद्रप्रमुख टीमचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.




No comments:

Post a Comment