तळेरे : दिनांक : १७ जानेवारी २०१९ :
शिष्यवृत्तीची परीक्षा जवळ आलेली आहे, विविध संघटनांच्या माध्यमांतून शालेय स्पर्धा परीक्षांच्या सराव चाचण्या घेण्यात येत आहेत, ही एक उल्लेखनीय बाब आहे. तळेरे नं. १ शाळेत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, सिंधुदुर्ग आयोजित ' दि स्कॉलर ऑफ सिंधदुर्ग ' अवॉर्ड पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेच्या उदघाटन प्रसंगी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित वित्त व बांधकाम समिती सभापती रविंद्र जठार यांनी वरील उद्गार काढले. सभापती दिलीप तळेकर यांनीही संघटनेच्या उपक्रमाबद्दल तोंड भरून कौतुक केले.
त्यावेळी कार्यक्रमाला कणकवली पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती व तळेरे नं. १ शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप तळेकर , तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , परीक्षा प्रमुख , कोषाध्यक्ष व शेर्पे- साळीस्ते केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल , संघटनेचे कणकवली अध्यक्ष लक्ष्मण वळवी , सचिव भूषण हर्णे , कणकवली प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक दत्ता सावंत, विठ्ठल जाधव, विनायक जाधव, संजना ठाकूर, क्रांती वालावलकर, कासार्डे केंद्रप्रमुख संजय पवार , खारेपाटण केंद्रप्रमुख नारायण ओटवकर , आशा गुणीजन , जगदीश गोसावी, एकनाथ सावळे, तळेरे उपसरपंच दिपक नांदलस्कर, ग्रामपंचायत सदस्य दिनेश मुद्रस, गणेश राणे , प्रहारचे पत्रकार गुरुप्रसाद सावंत, प्रवीण कुबल आणि तळेरे प्रभागातील ६४ विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीताराम पारधिये यांनी केले. मुलांच्या व उपस्थित शिक्षकांच्या भोजनाची व्यवस्था सभापती दिलीप तळेकर आणि तळेरे नं. १ शाळेच्या शिक्षकवृंदांकडून करण्यात आला. पर्यवेक्षण व पेपर तपासणीसाठी गुरुप्रसाद पाटील, जाकीर शेख , सत्यवान केसरकर, श्रीराम विभुते, अमोल भंडारी, अमोल शिंदे, माधवी बुचडे, ज्योती ब्रम्हदंडे, संदिप ब्रह्मदंडे, स्नेहल जाधव, सविता दाबेराव , साक्षी घाडीगावकर, अनुप तळेकर, स्वप्नाली बेळणेकर यांनी विशेष सहकार्य केले.
अतिशय उत्तम नियोजनाबद्दल तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनी संघटनेच्या शैक्षणिक कार्याबद्दल धन्यवाद दिले. दोन्ही सभापतींनी सर्व मुलांना जिल्ह्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.जाकीर शेख यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:
Post a Comment