शिडवणे : दिनांक : २३ जानेवारी २०२० :
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी रविवारी दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी सिंधदुर्ग जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार , कणकवली पंचायत समितीचे सभापती दिलीप तळेकर, पंचायत समिती सदस्या तृप्ती माळवदे , शिडवणे सरपंच शीतल जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश रांबाडे, तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे, केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सकाळी ठिक आठ वाजता ध्वजारोहण कार्यक्रम , दुपारी २ वाजता हळदीकुंकू समारंभ, महिला मेळावा, फनीगेम्स, सायंकाळी ठिक सात वाजता उदघाटन समारंभ, मान्यवर व माजी शिक्षकांचा सत्कार , रात्री ८. ०० वाजता मुलांचे विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.
तरी सदर कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्व शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेत मुलांना प्रोत्साहन द्यावे , अशी नम्र विनंती शालेय स्वराज्य मंडळाचे सांस्कृतिक मंत्री कु. आर्यन चव्हाण , शालेय मुख्यमंत्री कु. सुयश शेट्ये , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रांबाडे आणि शिडवणे नं. १ शाळेचे मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment