Thursday, January 9, 2020

कणकवलीत १० फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक वधू वर मेळावा

कणकवली : दिनांक ९ जानेवारी २०२० :
          महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ , जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने नाभिक  समाजातील वधू - वरांसाठी ' वधू - वर परिचय मेळावा ' सोमवार दिनांक १० फेब्रुवारी २०२० रोजी आयोजित केलेला आहे .. हा भव्य मेळावा महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष मा. श्री. कल्याणजी दळेसाहेब व त्यांची टीम , राज्य उपाध्यक्ष मा. श्री. विजयजी सि. चव्हाणसाहेब ,  सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष मा. अनिल यशवंत अणावकरसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. त्यावेळी माजी सर्व जिल्हाध्यक्ष , कमिटी सदस्य , ज्येष्ठ नागरिक ,  सर्व तालुक्यांचे अध्यक्ष , सर्व तालुक्यांचे सचिव , महिला अध्यक्षा , तालुका सदस्य , विद्यमान जिल्हा कमिटी सदस्य , युवक- युवती , वधू - वर यांचीही उपस्थिती लाभणार आहे. मेळाव्याचे ठिकाण चौंडेश्वरी मंगल कार्यालय , कणकवली हे असून भालचंद्र महाराज संस्थान रोड पासून आल्यास गणपती सान्याच्या अगोदर आहे.
           तरी सिंधुदुर्ग व जवळच्या जिल्हयांतील , राज्यांतील  नाभिक समाजातील सर्व वधू वरांनी आपला नाव नोंदणी अर्ज विहित नमुन्यामध्ये आपापल्या तालुका अध्यक्षांकडे भरून जमा करावा. सदर भव्य सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सुयोग्य असे वधू- वर निवडून आपल्या आयुष्याला नव्या उमेदीने सुरुवात करावी. या मेळाव्यास सर्व ज्ञाती बांधवांची , सभासद यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे, अशी नम्र विनंती सिंधुदुर्ग नाभिक संघटनेने केली आहे.
           ज्या वधू वरांना या मेळाव्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी प्रत्येक तालुक्याच्या अध्यक्षांशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील उमेदवारांसाठी २५० रु. प्रवेश शुल्क असून जिल्ह्याबाहेरील वधू वरांसाठी ५०० रु. प्रवेश शुल्क आकारण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी  आनंद आचरेकर ( मालवण ) ९४२१२६३३२३, रविंद्र महाले ( दोडामार्ग ) ९५२२९२९९१९ , किरण पवार ( वेंगुर्ला ) ९४२३८३२९२९  ,वैभव चव्हाण ( सावंतवाडी ) ९४०२०२०४७४५ ,  नितेश पिंगुळकर ( कुडाळ ) ९४०४९१६४१९ , लक्ष्मीकांत चव्हाण ( कणकवली ) ९८८१४७१६८४  , अनिल सदाशिव कदम  ( वैभववाडी ) ९५२९५३१७१२ , प्रमोद विजय चव्हाण ( देवगड ) ९४०३५६३६४२ या नंबर वर संपर्क करण्याची विनंती जिल्हा नाभिक संघटनेने केली आहे.
           
                                                                  

No comments:

Post a Comment