कणकवली : दिनांक : २१ जानेवारी २०२० :
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या माध्यमातून अत्यंत स्तुत्य असे शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रम राबवले जातात. मुलांनी स्पर्धेत अधिक यश संपादन करण्याच्या दृष्टीने शिक्षक समिती मोलाचे सहकार्य करीत आहे. गरीब, गरजू व खेळताना जखमी झालेल्या मुलांना आर्थिक सहकार्य करत शिक्षक समिती जे सामाजिक कार्य करत आहे त्याला तोड नाही. या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांना सराव परीक्षेच्या माध्यमातून अधिक गुणवत्तेकडे नेण्याच्या प्रयत्नांबद्दल नवनिर्वाचित वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार यांनी सर्व शिक्षक समितीच्या पाईकांचे विशेष कौतुक केले.
जानवली मारुतीमंदिर शाळेमध्ये जिल्हास्तरीय सराव परीक्षेचा उदघाटन समारंभ संपन्न झाला. त्यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा वित्त बांधकाम सभापती रविंद्र जठार , नवनिर्वाचित कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषद सदस्या श्रिया सावंत, जि. प . सदस्य सुधीर नकाशे, माजी कणकवली सभापती संतोष कानडे , पं. स. सदस्य मनोज रावराणे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, कॉमन पूल विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर, कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस , शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे , राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर , राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे , कणकवली तालुकाध्यक्ष विनायक जाधव, सचिव सुशांत मर्गज , मारुतीमंदिर च्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दिशा राणे, सरपंच अमोल राणे , मुख्याध्यापिका चंद्ररेखा नाईक, शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस , केंद्रप्रमुख नितीन कदम, लक्ष्मण वळवी , केंद्रप्रमुख विजय मसुरकर , केंद्रप्रमुख विजय भोगले, किशोर कदम , संतोष जाधव, प्रदीप मांजरेकर, केंद्रप्रमुख के. एम . पवार , सुहास सावंत , आनंद तांबे , शिक्षक समितीचे शिलेदार , पर्यवेक्षक शिक्षक , पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
दिलीप तळेकर म्हणाले , शिक्षक समिती मार्फत घेत असलेली सराव परीक्षा अत्यंत उपयुक्त असून ती शासकीय परीक्षेसारखी गुप्तता पाळून घेतली जाते. आपला जिल्हा राज्यात शैक्षणिक क्षेत्रात दर्जेदार होण्याच्या दृष्टीने समितीचे योगदान अनमोल असेच आहे. त्याबद्दल त्यांनी सर्व शिक्षक समितीच्या शिलेदारांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. आभार प्रदर्शन गिल्बर्ट फर्नांडिस यांनी केले. या दिवशी सिंधदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या सर्व केंद्रावर मुलांच्या भोजनाचीही मोफत सोय शिक्षक समिती व शिक्षकांच्या माध्यमातुन करण्यात आली होती.या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ३५०० विद्यार्थी प्रविष्ठ झालेले असून यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक समितीच्या वतीने समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment