तळेरे : दिनांक : ९ जानेवारी २०२० :
मुलांनी स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे व विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून नियोजनपूर्वक अभ्यास करून आपल्या शाळेचे, केंद्राचे , प्रभागाचे नाव उंचावून नेहमी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी , असे प्रतिपादन तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनी तळेरे नं. १ शाळेमध्ये तळेरे प्रभागस्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेच्या शुभारंभी केले.
त्यावेळी कासार्डे केंद्रप्रमुख संजय पवार , शिक्षक समितीचे नेते गिल्बर्ट फर्नांडिस , शिक्षक समितीचे कणकवली तालुकाध्यक्ष विनायक जाधव , खारेपाटण नं. १ चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर , एकनाथ सावळे , जगदीश गोसावी , सत्यवान घाडीगावकर आणि प्रभागातील बहुसंख्य शिक्षक , विद्यार्थी उपस्थित होते.
परीक्षेची वेळ ११ ते ३ अशी ठेवण्यात आली होती. सदर परीक्षेसाठी स्टेशनरी खर्च साळीस्ते- शेर्पे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांनी केला. संकल्पना शेर्पे शाळेचे उपशिक्षक अमोल भंडारी यांची होती. टंकलेखन कुसूर महाविद्यालयाचे प्राध्यापक रावराणेसर यांनी अल्पखर्चामध्ये केले होते. आर्थिक भार तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल आणि प्रभागातील सर्व केंद्रप्रमुख व शिक्षकांच्या सहकार्याने उचलण्यात आला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या दुपारच्या माध्यान्ह भोजनाचीही उत्तम व्यवस्था कणकवली पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती दिलीप तळेकर व तळेरे नं. १ चा शिक्षकवृंद यांच्या वतीने करण्यात आली होती. एकूण ११५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घेतला. पालकवर्गाने व शिक्षणप्रेमींनी तळेरे प्रभागस्तरीय शिष्यवृत्ती सराव वर्गाच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले आहे. १७ जानेवारी रोजी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ यांचेमार्फत तळेरे प्रभागात शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच २१ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , शाखा - कणकवलीच्या वतीने सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना या सर्व परीक्षांचा लाभ द्यावा असे आवाहन तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment