Monday, January 20, 2020

१० फेब्रुवारीचा नाभिक वधुवर मेळावा भव्यदिव्य होणार : राज्य उपाध्यक्ष विजय चव्हाण

कणकवली : दिनांक २० जानेवारी २०२० :
          हल्ली सर्व समाजांचे वधू वर मेळावे संपन्न होत आहेत. त्यामध्ये वर मुलांची संख्या जास्त असून वधू मुलींची संख्या कमी झाल्याची दिसून येत आहे. आपल्या मुलींना चांगला वर मिळावा अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण वर आणि वधू शोधण्यासाठी बराच आटापिटा करावा लागतो. जिल्हा नाभिक मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या वधू वर परिचय मेळाव्याला सिंधुदुर्ग , रत्नागिरी , गोवा , मुंबई या ठिकाणांहून अनेक वर वधू येण्याची शक्यता असल्याचे मत महाराष्ट्र नाभिक महामंडळ ( मुंबई ) चे राज्य उपाध्यक्ष विजय चव्हाण यांनी कणकवली तालुका नाभिक सहविचार सभेत बोलताना व्यक्त केले.
          त्यावेळी जिल्हा सचिव सुधीर चव्हाण यांनी वधू वर मेळाव्याचे नियोजन सांगितले. जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी सर्व विभागीय अध्यक्षांना व सचिवांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. गुरुवारी २३ जानेवारी रोजी जिल्हा दौरा असून १० वाजता कनेडी , १२ वाजता फोंडा, ३ वाजता नांदगाव , ५ वाजता तळेरे आणि ७ वाजता खारेपाटण या विभागीय स्तरावर प्रत्यक्ष भेटी घेतल्या जाणार असल्याचे सांगितले. जिल्हा उपाध्यक्ष विठोबा चव्हाण , ज्येष्ठ सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दत्ताराम चव्हाण, ज्येष्ठ निवृत्त मुख्याध्यापक दिगंबर चव्हाण , महिला अध्यक्षा संजना चव्हाण यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कणकवली विभागाच्या वतीने महिलांना स्वागताची जबाबदारी देण्यात आली. स्वयंसेवक, स्वयंसेविका, स्वागत कमिटी , व्यवस्थापन कमिटी इत्यादी कमिट्या नेमून त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या सांगण्यात आल्या. प्रभागस्तरावर वधू वर नोंदणी फॉर्मचे वितरण करण्यात आले.
          जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण, शंकर चव्हाण , हेमांगी अणावकर, राजेश चव्हाण , ईश्वरी कुबल , प्रिया चव्हाण , सुनील चव्हाण , अनंत चव्हाण , श्रीकांत टाकळे, रमेश आचरेकर, नंदकुमार चव्हाण , नंदकिशोर चव्हाण, अशोक चव्हाण, दिप्ती चव्हाण , अरुण चव्हाण, विठोबा चव्हाण, महेश चव्हाण, प्रवीण चव्हाण, प्रकाश लाड, अभिलाषा शिंदे, रुपेश पिंगुळकर, सुभाष चव्हाण  आणि लक्ष्मीकांत चव्हाण यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे जिल्हा संघटनेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. सचिव प्रवीण कुबल यांनी सर्वांचे आभार मानले. सभेला ८५ पेक्षा जास्त कणकवली नाभिक बंधू भगिनी उपस्थित होते.


























No comments:

Post a Comment