Thursday, January 9, 2020

चंदूच्या स्मृतीनिमित्त कुडाळ नाभिकांचे रक्तदान शिबीर

कुडाळ : दिनांक : ९ जानेवारी २०२० :
          गेल्या वर्षी २० जानेवारी २०१९ रोजी कुडाळ नाभिक संघटनेचे माजी अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत सदानंद चव्हाण उर्फ चंदू यांचे एका अपघातात देहावसान झाले. काळाने नाभिकांचा लाडका नेता हिरावून नेला याबद्दल संपूर्ण सिंधुदुर्ग नाभिक संघटना शोक करत होती. एक प्रामाणिक कार्यकर्ता हरपला याचे दुःख होतेच , पण कुटुंबातील करता सवरता पिता , पुत्र , पती अशा विविध कौटुंबिक भूमिका बजावणारा चंदू सर्वाना सोडून कायमचा निघून गेला होता. २० जानेवारी २०२० या दिवशी त्यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून कुडाळ नाभिक संघटनेने ' रक्तदान शिबीर ' आयोजित केले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून साळगाव येथे सर्व नाभिक बांधवांनी प्रथम स्मृतिदिनाला आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे सचिव सुधीर चव्हाण यांनी केले आहे. जिल्हा कमिटी, कुडाळ तालुका कमिटी, विभाग प्रमुख, महिला कमिटी आणि तमाम सर्वसाधारण सदस्य यांनी उपस्थित राहून रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्यास ती आपल्या चंदूला खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल अशी भावना कुडाळ तालुका नाभिक संघटनेने व्यक्त केली आहे. 

No comments:

Post a Comment