साळीस्ते : दिनांक : २८ डिसेंबर २०१९ :
इंग्रजी ही आपली ज्ञानभाषा आहे. मराठी शाळेत इंग्रजी शिकवताना ती तृतीय भाषा म्हणून शिकवली जाते. तेजस उपक्रमांतर्गत इंग्रजी भाषेचा अधिक सराव व्हावा हा उद्देश ठेवून शासनाने गेल्यावर्षीपासून शिक्षकांची ' टॅग मिटिंग ' सुरु केली. त्यात प्राथमिक शाळेतील १ ते ५ चे एक व १ ते ८ चे २ शिक्षक मिटींगला येत असत. टॅग मिटिंग मध्ये घेतलेले उपक्रम शिक्षकांना वर्गाध्यापनात उपयोगी पडत असत. या महात एकूण १० मिटिंग पूर्ण होत असून ज्या शिक्षकांच्या १० मिटिंग पूर्ण झालेल्या असतील त्यांना शासनाकडून प्रमाणपत्र मिळणार आहे.
अशा या टॅग मिटींगच्या माध्यमातून अनेक शिक्षकांना इंग्रजीबद्दल वाटणारी भीती कमी झाल्याचे दिसून आले आहे. कारण या टॅग मीटिंगमध्ये एक आत्मविश्वास मिळतो कि आपणही न घाबरता इंग्रजी बोलू शकतो. म्हणूनच टॅग मिटिंग शिक्षकांना पर्यायाने विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्यासाठी प्रेरणा देते असे प्रतिपादन शेर्पे- साळीस्ते - खारेपाटण केंद्राचे टॅग समन्वयक गोविंद वावदाणे यांनी साळीस्ते नं. १ शाळेत केले.
त्यावेळी शेर्पे- साळीस्ते केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल म्हणाले, गोविंद वावदाने यांनी टॅगच्या १० सभा अगदी नियोजनपूर्वक घेतल्या असून त्यांनी इंग्रजी बोलण्याचा धरलेला आग्रह बरोबर आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या विद्यार्थ्यांना सक्षम बनवले पाहिजे. मुलांनी स्पर्धा परीक्षांमध्ये कमी पडू नये याची आपण शिक्षक म्हणून अधिक काळजी घेण्याची गरज आहे. सर्वजण प्रयत्न करतच आहेत, तरीही अधिक जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपला विद्यार्थी स्पर्धेत टिकावा अशी तयारी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
तळेरे नं. १ शाळेच्या उपशिक्षिका बेळणेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. साळीस्ते नं. १ शाळेच्या पदवीधर शिक्षिका बुचडे यांनी वेलकम प्रतिज्ञा घेतली. गोविंद वावदाने यांनी नियोजनाप्रमाणे सर्व तासिका घेतल्या. वाचन, आकलन, काळ, उपवाक्य इत्यादी बाबींवर भर देत त्यांनी चर्चा करत प्रात्यक्षिक स्वरूपात सर्व मुद्द्यांचे स्पष्टीकरण केले. सर्व उपक्रमांमध्ये सर्व शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. तळेरे औदुंबर शाळेच्या उपशिक्षिका साळुंखे यांनी सर्वांचे इंग्रजीत आभार मानले.

No comments:
Post a Comment