कणकवली : दिनांक : ९ डिसेंबर २०१९ :
महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ कणकवली तालुका शाखेची सहविचार सभा जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर म्हणाले कि यावर्षी आपण लवकरच जिल्हास्तरीय नाभिक बांधवांचा भव्य वधू वर मेळावा घेणार असून त्याला संपूर्ण आठही तालुक्यांमधून १०० पेक्षा जास्त वधू वर उपस्थित राहून मेळावा यशस्वी करतील. आपण यजमान तालुका असल्याने कणकवली तालुक्यातील सर्व नाभिक बांधवांनी विशेष परिश्रम घेऊन मेळावा यशस्वी करण्यासाठी अधिक उत्साहाने प्रयत्न करण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले.
सहविचार सभा लक्ष्मीकांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेला मालवण तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर, संत सेना महाराज पतसंस्थेचे पदाधिकारी शंकर चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कणकवली, कनेडी , तरेळे , फोंडा , नांदगाव या विभागातील बहुसंख्य नाभिक बांधव उपस्थित होते. सचिव प्रवीण कुबल यांनी सर्वांचे स्वागत केले. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. समाजातील देहावसान झालेल्या नाभिक बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळ्यातील सर्व कार्यक्रमांचा व जमा खर्चाचा तपशीलवार आढावा घेऊन त्यावर चर्चा झाली. नाभिक बांधवांची ओळखपत्रे बनवणे संदर्भात आपली आवश्यक माहिती सचिवांना देणेबाबत विनंती करण्यात आली. ड्रेसकोडचे पालन करावे असे ठरवण्यात आले. वधुवर मेळाव्याचे नियोजन करण्यासंदर्भात जिल्हयाच्या सभेनंतर पुनश्च सभा घेऊन अंतिम नियोजन करण्याविषयी चर्चा झाली.
३० डिसेंबर रोजी सोमवारी ' कणकवली ते आंगणेवाडी ' नाभिकांची पायी वारी प्रतिवर्षाप्रमाणे होणार असल्याने त्यात सहभागी व्हायचे असल्यास अनिल अणावकर, चंद्रशेखर चव्हाण , प्रवीण कुबल, दशरथ चव्हाण यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. फोंडा सचिव रोहिदास चव्हाण यांनी संत सेना महाराज यांच्याबद्दलची माहिती, अभंग, पुस्तके यांचा संग्रह केल्याबद्दल त्याचे संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले. आपत्कालीन आर्थिक मदतीसाठी ट्रस्ट स्थापन करण्याबाबतचे अनमोल विचार आनंद आचरेकर यांनी मांडले. आपली संत सेना नाभिक पतसंस्था अधिक चांगल्याप्रकारे चालावी यासाठी सर्वांनी आर्थिक गुंतवणूक करून पतसंस्थेला चांगले दिवस प्राप्त करून देण्याचा आग्रह संस्थेचे पदाधिकारी शंकर चव्हाण यांनी व्यक्त केला. जिल्हा उपाध्यक्ष विठोबा चव्हाण यांनी समाजबांधवांनी संकुचित विचार करू नये असे परखडपणे सांगितले. सचिव प्रवीण कुबल यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment