Monday, December 9, 2019

शिक्षकनिर्मित अध्यापन साहित्यनिर्मितीत सीताराम पारधिये प्रथम

साळीस्ते : दिनांक ०९ डिसेंबर  २०१९ :
          कणकवली तालुकास्तरीय ४२ व्या विज्ञान प्रदर्शनात साळीस्ते नं. १ शाळेचे पदवीधर शिक्षक सीताराम पारधिये यांनी अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. ल . गो. सामंत विद्यालय हरकुळ येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय प्रदर्शनात अनेक शिक्षकांनी आपली निर्मिती मांडली होती. त्यात सीताराम पारधिये यांचे ' ज्ञानरचनावादी गणित ' हे मॉडेल सरस ठरले असून त्यांना जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आपले मॉडेल पुनश्च सादर करता येणार आहे.
          केंद्रशाळा साळीस्ते नं. १ या शाळेने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष ताम्हणकर , चंदूशेठ हर्याण , अनिल ताम्हणकर, सरपंच मैथिली कांबळे, उपसरपंच शांताराम कांजीर , शाळेचे मुख्याध्यापक सत्यवान घाडीगावकर, सर्व शिक्षकवृंद पाष्टे, वळवी , बुचडे , ग्रामपंचायत सदस्या आरती हर्याण , अंगणवाडी सेविका दिपाली गुरव यांनी प्रत्यक्ष भेटून सीताराम पारधिये यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
           केंद्रातील सर्व शिक्षकांनी पारधिये यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करून त्यांना जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


No comments:

Post a Comment