तळेरे : दिनांक : २७ डिसेंबर २०१९ :
सर्वांच्या प्रेमामुळेच मला सभापतीपद लाभले आहे. शाळा हे माझे दुसरे घरच आहे. शिक्षकांनी केलेला सत्कार हा मला आनंद देणारा आहे. शिक्षकांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेत शिकणारी मुले स्पर्धा परीक्षेत अधिक यशस्वी होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे मौलिक मार्गदर्शन कणकवली तालुक्याचे नवनिर्वाचित सभापती दिलीप तळेकर यांनी सत्काराला उत्तर देताना केले. तळेरे प्रभाग म्हणजे माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे. त्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शिक्षकांच्या व शाळांच्या समस्या प्राधान्याने पूर्ण करण्याकडे मी अधिक लक्ष देईन. तरीही शिक्षकांनी आपापली जबाबदारी सजगतेने पार पाडावी.
तळेरे प्रभागाच्या शेर्पे, साळीस्ते , खारेपाटण व कासार्डे या चारही केंद्रांच्या वतीने नवनिर्वाचित सभापती दिलीप तळेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हृदय सत्कार करण्यात आला. त्यावेळी तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , शेर्पे- साळीस्ते केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल , कासार्डे केंद्रप्रमुख संजय पवार , खारेपाटण केंद्रप्रमुख नारायण ओटवकर , उच्चश्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, उपशिक्षक उपस्थित होते.
शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे म्हणाले , तळेरे प्रभागाला दिलीप तळेकर यांच्या रूपाने एक शिक्षणप्रेमी सभापती लाभलेले आहेत. आपल्या तळेरे प्रभागातील शिक्षकांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांनी दिलेली जबाबदारी आम्ही जास्तीत जास्त जिद्दीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
सभापती दिलीप तळेकर यांच्या शुभहस्ते तळेरे प्रभागातील विजेत्या शाळांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तालुका कणकवलीची जनरल चॅम्पिअनशिप तळेरे प्रभागाला मिळाल्याबद्दल सभापतींनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन सीताराम पारधिये यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीराम विभुते यांनी केले.

No comments:
Post a Comment