कळसुली : दिनांक २२ डिसेंबर २०१९ :
२० आणि २१ डिसेंबर या दोन दिवसीय तालुकास्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव कळसुली शिक्षण संघ, मुंबई यांच्या कळसुली इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टस् , कळसुली येथे मोठया दिमाखात संपन्न झाला.तालुका कणकवलीची चॅम्पिअनशिप तळेरे प्रभागाने तर उपचॅम्पिअनशिप फोंडा प्रभागाने पटकावली. विजेत्या स्पर्धकांचे मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मान्यवरांनी सर्व विजेत्यांना पुढील जिल्हास्तरीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .
दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाची सांगता झाली. त्यावेळी कणकवली पंचायत समितीच्या सभापती सुजाता हळदिवे , उपसभापती सुचिता दळवी , पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री , कळसुली ग्रामपंचायत सरपंच साक्षी परब, कणकवली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर , क्रीडाप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी किशोर गवस , तळेरे प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , कनेडी प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी अशोक वडर , कळसुली इंग्लिश स्कुलचे स्कुल कमिटी व्हॉईस चेअरमन के. आर. दळवी , मुख्याध्यापक विष्णू वगरे , सर्व केंद्रप्रमुख , सर्व प्राथमिक शिक्षक संघटना पदाधिकारी , सर्व शालेय समित्यांचे पदाधिकारी , पालक, ग्रामस्थ, शिक्षक, खेळाडू व क्रीडाप्रेमी रसिक प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम, नितीन पाटील यांनी केले. प्रमाणपत्रे , रेकॉर्ड इत्यादी जबाबदारी केंद्रप्रमुख अनंत राणे यांनी अतिशय उत्तम प्रकारे पार पाडली. दोन्ही दिवस कळसुलीतील सर्व शिक्षक वर्गाने व पालकवर्गाने अतिशय मेहनत घेऊन सर्वांचे स्वागत करून अत्यंत चांगल्या प्रकारच्या भोजनाची, चहापानाची व्यवस्था केली. तालुकास्तरीय क्रीडामहोत्सवाचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे :
लहान गट : संयुक्त
लहान गट : मुलगे

- ज्ञानी मी होणार : विजेता : नरडवे नं. १ ( नरडवे / कनेडी ), उपविजेता : फोंडा बावीचे भाटले ( फोंडा )
- समूहगान : विजेता : माईन नं. १ ( सावडाव / हुमरट ) , उपविजेता : कणकवली नं. ३ ( कणकवली )
- समूहनृत्य : विजेता : ओटव नं. १ ( सावडाव / हुमरट ), उपविजेता : तळेरे नं. १ ( साळीस्ते / तळेरे )
मोठा गट : संयुक्त
- ज्ञानी मी होणार : विजेता : हरकुळ खुर्द गावडेवाडी ( हरकुळ ? फोंडा ) , उपविजेता :
- समूहगीत : विजेता : नागवे नं. १ ( हरकुळ / कनेडी ) , उपविजेता : फोंडा गांगोवाडी ( फोंडा )
- समूहनृत्य : विजेता : कणकवली नं. ३ ( कणकवली ) , उपविजेता : हरकुळ खुर्द गावडेवाडी ( फोंडा )
लहान गट : मुलगे
- ५० मीटर धावणे : प्रथम : अभिषेक दिलीप तेली ( हरकुळ तेलीवाडी ) , द्वितीय : अविनाश दिलीप तेली ( हरकुळ तेलीवाडी )
- १०० मीटर धावणे : प्रथम : अभिषेक दिलीप तेली ( हरकुळ तेलीवाडी ) , द्वितीय : अविनाश दिलीप तेली ( हरकुळ तेलीवाडी )
- लांबउडी : प्रथम : रतन अनंत धुमक , ( घोणसरी नं.५ ), द्वितीय : जीवन शामा जाधव ( कलमठ कुंभार )
- उंचउडी : प्रथम : कुलदीप चंद्रशेखर निसाद ( जानवली मारुतीमंदिर ), द्वितीय : ओम उमेश ताम्हाणेकर ( हरकुळ खुर्द गावडेवाडी )
- ५० बाय ४ रिले : विजेता : हरकुळ खुर्द गावडेवाडी , उपविजेता : वारगाव नं. ३
- कबड्डी : विजेता : केंद्र साळीस्ते ( तळेरे ) , उपविजेता : केंद्र फोंडा ( फोंडा )
- खोखो : विजेता : शिडवणे नं. १ ( केंद्र शेर्पे , प्रभाग तळेरे ) , उपविजेता : फोंडा गांगोवाडी ( फोंडा )
- लंगडी : विजेता : कणकवली नं. ३ ( कणकवली ) , उपविजेता : वारगाव नं. १ ( साळीस्ते / तळेरे )
लहान गट : मुली
- ५० मीटर धावणे : प्रथम : अनुष्का चंद्रकांत पांचाळ ( दारुम नं. १ ) साळीस्ते / तळेरे , द्वितीय : सोफिया रुजात फर्नांडिस ( सांगवे घोसाळ ) भिरवंडे / कनेडी
- १०० मीटर धावणे : प्रथम : सायली लक्ष्मण निकम ( फोंडा बोकलभाटले ) फोंडा , द्वितीय : पुजा विलास मराठे ( दिगवळे बामणदेव ) नरडवे / कनेडी
- लांबउडी : प्रथम : कोमल महेश शेलार ( शेर्पे नं. १ ) शेर्पे / तळेरे , द्वितीय : आर्य गंगाराम खरात ( फोंडा गांगोवाडी ) फोंडा
- उंचउडी : प्रथम : कार्तिकी पंढरी डोंगरे ( हरकुळ खुर्द नं. १ ) हरकुळ / फोंडा , द्वितीय : कोमल महेश शेलार ( शेर्पे नं. १ ) शेर्पे / तळेरे
- ५० बाय ४ रिले : विजेता : वारगाव नं. १( साळीस्ते / तळेरे ), द्वितीय : फोंडा गांगोवाडी , फोंडा
- कबड्डी : विजेता : प्रभाग फोंडा , द्वितीय : तळेरे
- खोखो : विजेता : शिडवणे नं. १ ( शेर्पे / तळेरे ) , उपविजेता : फोंडा
- लंगडी : विजेता : आशिये ( कणकवली ) , उपविजेता : तळेरे
मोठा गट : मुलगे
- १०० मीटर धावणे : प्रथम : वैभव संजय कुडाळकर : कुरंगवणे खैराट ( शेर्पे / तळेरे ) ,द्वितीय : अजनब नफीस शेख , हरकुळ बुद्रुक उर्दू ( हरकुळ बुद्रुक / फोंडा )
- २०० मीटर धावणे : प्रथम : संकेत विष्णू राठवड , बोर्डवे नं. ३ ( बोर्डवे / कणकवली ), द्वितीय : आदित्य दशरथ जाधव , वारगाव नं. १ ( साळीस्ते / तळेरे )
- लांबउडी : प्रथम : प्रफुल्ल संतोष मण्यार , नडगिवे नं. १ ( खारेपाटण / तळेरे ), द्वितीय : आर्यन सुनिल वाघाटे , कणकवली नं. ३
- उंचउडी : प्रथम : विकास प्रकाश पवार , कासार्डे नं. १ ( कासार्डे / तळेरे ), द्वितीय : विशाल जगन्नाथ चव्हाण , कासार्डे नं. १ ( कासार्डे / तळेरे )
- गोळाफेक : प्रथम : शंकर भावकाना धबाले , कणकवली नं. २ ( कणकवली ), द्वितीय : वैभव संजय कुडाळकर , कुरंगवणे खैराट ( शेर्पे / तळेरे )
- १०० बाय ४ रिले : विजेता : कासार्डे नं. १ ( कासार्डे / तळेरे ) , उपविजेता : हळवल नं. १ ( हळवल / कणकवली )
- कबड्डी : विजेता : तळेरे प्रभाग , उपविजेता : कणकवली प्रभाग
- खोखो : विजेता : शिडवणे नं. १ ( शेर्पे / तळेरे ) , उपविजेता : फोंडा गांगोवाडी ( फोंडा )
- लंगडी : विजेता : कणकवली नं. ३ ( कणकवली ) , उपविजेता : घोणसरी ( फोंडा )
मोठा गट : मुली
- १०० मीटर धावणे : प्रथम : पायल सचिन गावकर , कसवण नं. २ ( हळवल / कणकवली ) द्वितीय : अक्षता बाळकृष्ण पाटणकर , खारेपाटण नं. १ ( खारेपाटण / तळेरे )
- २०० मीटर धावणे : प्रथम : पूजा नाना मेस्त्री , हळवल नं. १ ( हळवल / कणकवली ), द्वितीय : भूमी सत्यवान देसाई , दिगवळे बामणदेव ( नरडवे / कनेडी )
- लांबउडी : प्रथम : प्रतीक्षा विवेकानंद केसरकर , सावडाव खलांतर ( सावडाव/ हुमरट ), द्वितीय : भूमी सत्यवान देसाई , दिगवळे बामणदेव ( नरडवे / कनेडी )
- उंचउडी : प्रथम : अनुष्का अनिल मांडवकर , लोरे नं. १ ( घोणसरी / फोंडा ) , द्वितीय : तन्वी उमेश मेस्त्री , वरवडे फणसवाडी ( बिडवाडी / हुमरट )
- गोळाफेक : प्रथम : जॉली बावस्तीन फर्नांडिस , घोणसरी नं. १ ( घोणसरी / फोंडा ), द्वितीय : कश्यपी राजेंद्र माईणकर , दारुम नं. १ ( साळीस्ते / तळेरे )
- १०० बाय ४ रिले : विजेता : हळवल नं. १ ( हळवल / कणकवली ) , उपविजेता : वारगाव नं. १ ( साळीस्ते / तळेरे )
- कबड्डी : विजेता : हरकुळ उर्दू ( हरकुळ बुद्रुक / कनेडी) , उपविजेता : तळेरे प्रभाग
- खोखो : विजेता : शिडवणे नं. १ ( शेर्पे / तळेरे ) , उपविजेता : प्रभाग फोंडा
- लंगडी : विजेता : तळेरे प्रभाग , उपविजेता : हुमरट प्रभाग
No comments:
Post a Comment