Tuesday, December 17, 2019

विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी खिलाडूवृत्तीने क्रीडामहोत्सवाचा आनंद घ्या : रविंद्र जठार

वारगाव : दिनांक १७ डिसेंबर २०१९ :
          गेली १९ वर्षे जिल्हा परिषदेचा बाल कला , क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव राबवला जात असताना तळेरे प्रभागाचे खेळातील वर्चस्व कायमच राहिलेले आहे. त्यात आणखी भर घाला. राज्य, देश पातळीवरील खेळाडू घडवण्याचे महत्वाचे कार्य शिक्षक करीत असून स्पर्धेत यश ,अपयश मिळाले तरीही विद्यार्थ्यांना खिलाडूवृत्तीने खेळांना सामोरे जाण्याची सवय लावा , असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य रविंद्र जठार यांनी केले. तळेरे प्रभागस्तरीय क्रीडामहोत्सवाच्या अध्यक्षस्थानावरून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वारगाव नं. ३ च्या भव्य व्यासपीठावरून ते बोलत होते.
          त्यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती रत्नप्रभा वळंजू, वारगाव सरपंच प्रकाश नर , उपसरपंच नारायण उर्फ नाना  शेट्ये ,  वारगाव नं. ३ चे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र गुरव , उपाध्यक्ष तुषार मांडवकर , तंटामुक्ती अध्यक्ष राजेश जाधव, मुंबई विकास मंडळ वारगावचे अध्यक्ष शांताराम केसरकर , कार्याध्यक्ष विजयशेठ केसरकर , दारुम सरपंच सुनिंद्र सावंत , उपसरपंच भरत चव्हाण , वारगाव माजी सरपंच एकनाथ कोकाटे , इरफान मुल्ला , शिडवणे उपसरपंच दिपक पाटणकर , कासार्डे माजी सरपंच संतोष पारकर , वारगाव हायस्कुलचे मुख्याध्यापक हनुमंत वाळके , माजी पोलीस पाटील शंकर शेट्ये, शिडवणे नं. १ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश रांबाडे, शिक्षक संघटना प्रतिनिधी विनायक जाधव, मंगेश खांबाळकर , वळवीसर , लोकमत पत्रकार संतोष पाटणकर, तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, नारायण ओटवकर, संजय पवार , क्रीडाप्रमुख प्रदीप श्रावणकर , उपक्रीडाप्रमुख सत्यवान केसरकर , मुख्याध्यापिका कल्पना सावंत, पद्मजा करंदीकर , दशरथ शिंगारे , सत्यवान घाडीगावकर, परीक्षक संदीप नानचे , चंद्रशेखर कल्याणकर, विनोद मेस्त्री, क्रीडाप्रेमी नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
          प्रास्ताविक सुहास पाताडे यांनी केले. मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. रविंद्र लिंगायत यांनी गाऱ्हाणे घातले. मुंबई विकास मंडळ वारगावचे कार्याध्यक्ष विजयशेठ केसरकर यांनी शाळेला 'एल इ डी प्रोजेक्टर ' ची देणगी दिली. त्याचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. धनश्री शेट्ये हिला एपीजे अब्दुल कलाम परीक्षेत तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल गौरविण्यात आले.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी घाडीगावकर, समिक्षा डोंगळे, श्रीराम विभुते यांनी केले. आभार केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांनी मानले. पहिल्या दिवशी रंगमंचावरील कला व ज्ञानी मी होणार या स्पर्धा संपन्न झाल्या. आजचा निकाल :
ज्ञानी मी होणार : लहान गट : विजेते : कासार्डे ब्राम्हणवाडी : वेदांत अविनाश जैतापकर , मानसी नारायण जैतापकर , उपविजेते : साळीस्ते कांजीर
ज्ञानी मी होणार : मोठा गट : विजेते : खारेपाटण नं. १ : श्रुती संजय शेट्ये , पार्थिव भूपेश पाटणकर  ,
 उपविजेते : वारगाव नं. १
समूहगान : लहान गट : विजेते : तळेरे नं. १ , उपविजेते : शिडवणे कोनेवाडी
समूहगान : मोठा गट : विजेते : वारगाव नं. १ , उपविजेते : शिडवणे नं. १
समूहनृत्य : लहान गट : विजेते : तळेरे नं. १ , उपविजेते : खारेपाटण रामेश्वर
समूहनृत्य : मोठा गट : विजेते : शेर्पे नं. १ , उपविजेते : दारुम नं. १

       

No comments:

Post a Comment