वारगाव दिनांक : २५ डिसेंबर २०१९ :
नुकत्याच तळेरे प्रभागस्तरीय क्रीडामहोत्सव वारगाव नं. ३ भव्य पटांगणावर संपन्न झाला. त्या कार्यक्रमाचे औचित्य साधून वारगाव विकास मंडळाचे कार्याध्यक्ष विजयशेठ केसरकर यांनी शाळेला डिजिटल स्क्रीन व LED प्रोजेक्टर प्रदान करून शाळेला अत्यंत चांगल्या दर्जाचे अध्यापन साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
ते म्हणाले, आमच्या वारगाव शाळेतील मुले मला शिकून खूप मोठ्या पदावर काम करताना बघायची आहेत. मुलांनी नवनवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय हुशार व्हावे अशा शुभेच्छा त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केले.
हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये उच्च पदावर काम करत असताना विजयशेठ केसरकर यांनी सेवाभावी वृत्तीने आपल्या शाळेला शैक्षणिक साहित्य भेट दिल्याबद्दल सर्व शालेय पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत. सदर प्रोजेक्टरचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले. फीत कापून डिजिटल वर्गखोलीचे मान्यवरांच्या व विजयशेठ केसरकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ करून डिजिटल वर्ग सुरु करण्यात आला.
शाळेला उत्तम दर्जाची भेट दिल्याबद्दल जि. प. सदस्य रविंद्र जठार, वारगावचे सरपंच प्रकाश नर , शाळा व्यवस्थापन समिती वारगाव नं. ३, सर्व ग्रामपंचायत सदस्य वारगाव , शिक्षक - पालक संघ , माता- पालक संघ आणि सर्व शिक्षक वृंद यांनी देणगीदार विजयशेठ केसरकर यांना धन्यवाद दिले आहेत.

No comments:
Post a Comment