Monday, December 9, 2019

मैदानी खेळ खेळा आणि आपले आरोग्य सुदृढ बनवा : दिलीप तळेकर

साळीस्ते : दिनांक १० डिसेंबर २०१९ :
          मुलांनो, मैदानी खेळांमध्ये सक्रिय सहभाग घ्या, सध्या मुले मोबाईल आणि टीव्ही या दोन इडियट बॉक्स च्या आहारी गेली आहेत, त्यामुळे आता पुन्हा एकदा मुलांचे आरोग्य चांगले सुदृढ राहण्याच्या दृष्टीने मैदानी खेळ अत्यंत आवश्यक बनले आहेत. प्रतिवर्षी येणारा जिल्हा परिषदेचा क्रीडामहोत्सव मुलांच्या आरोग्याच्या जडणघडणीसाठी अत्यंत स्तुत्य असून सर्व मुलांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे मौलिक मार्गदर्शन कणकवली पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य दिलीप तळेकर यांनी साळीस्ते केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाच्या उदघाटन समारंभात बोलताना सांगितले.
          साळीस्ते केंद्रांतर्गत केंद्रस्तर दोन दिवसीय क्रीडामहोत्सव सुरु झाला असून उदघाटन समारंभाला उदघाटक कणकवली पंचायत समितीचे सदस्य दिलीप तळेकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा साळीस्ते ग्रामपंचायतच्या सरपंच मैथिली कांबळे. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष ताम्हणकर, चंदूशेठ हर्याण , अनिल ताम्हणकर, साळीस्ते गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष ताम्हणकरगुरुजी , पोलीस पाटील गोपाळ चव्हाण , दारुम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशवंत तळेकर, तरेळे सरपंच सर्पे, वारगाव नं .१  शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास कुलकर्णी, नाना शेट्ये , रत्नाकर गुरव, वैभव कांबळे, संतोष पाष्टे, साळीस्ते ग्रामपंचायत सदस्य निलेश रांबाडे , क्रीडाप्रमुख सत्यवान घाडी , उपक्रीडाप्रमुख दिनेश जंगले व सर्व शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक , सर्व विद्यार्थी खेळाडू व क्रीडाप्रेमी पालक , ग्रामस्थ उपस्थित होते.
           केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल , क्रीडाप्रमुख , उपक्रीडाप्रमुख , अध्यक्ष यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले. उदघाटकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मैदानावर प्रदर्शनीय सामन्याचा शुभारंभ करण्यात आला. प्रभाग तळेरेचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनी महोत्सवासाठी १००० रुपयांची आर्थिक देणगी दिली. गावातील दानशूर क्रीडाप्रेमी , शिक्षणप्रेमी पालकांनी स्पर्धेसाठी खारीचा वाटा उचलला. केंद्रातील सर्व शिक्षकांनीही आर्थिक व शारीरिक सहकार्य घेतले. विज्ञान प्रदर्शनात मिळालेल्या यशाबद्दल केंद्रशाळा साळीस्तेचे पदवीधर शिक्षक सीताराम पारधिये यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले. पहिल्या दिवशी समारंभपूर्वक कार्यक्रमानंतर लहान गट वैयक्तिक, दोन्ही गट सांघिक व ज्ञानी मी होणार दोन्ही गटांच्या स्पर्धा संपन्न झाल्या .




          

No comments:

Post a Comment