Saturday, December 14, 2019

नाभिक महिलांनो आपले आरोग्य जपा, आयुष्य वाढवा : समुपदेशक सुजाता रावराणे

कणकवली : दिनांक : १४ डिसेंबर २०१९ :
          महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ , मुंबई , शाखा कणकवली तालुका महिलांच्या सभेमध्ये ' महिलांनो, आपले आरोग्य सांभाळा ' या विषयावर मार्गदर्शन करताना समुदेशक सुजाता रावराणे यांनी अतिशय सोप्या भाषेत महिलांना उदाहरणे देत मार्गदर्शन केले.
           कणकवली तालुका नाभिक महिला सहविचार सभा कणकवली येथे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. त्यावेळी व्यासपीठावर मंडळाच्या अध्यक्षा संजना संजय चव्हाण , उपाध्यक्षा प्रिया प्रताप चव्हाण , कोषाध्यक्षा अभिलाषा अनिल शिंदे , सचिव ईश्वरी प्रवीण कुबल, सहसचिव हेमांगी अनिल अणावकर आणि मार्गदर्शिका समुपदेशक सुजाता रावराणे उपस्थित होत्या.
            सुरुवातीला समाजातील निर्वाण झालेल्या बांधवांना संघटनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले. मुख्य सचिव प्रवीण कुबल यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले व त्यावर सकारात्मक चर्चा घडवून आणली. ३० डिसेंबर रोजी कणकवली ते आंगणेवाडी पर्यंत निघणाऱ्या पायी वारी मध्ये उत्स्फूर्त सहभागी होण्यासाठी सचिवांनी आवाहन केले. जिल्हास्तरीय वधुवर मेळावा कणकवलीत संपन्न होणार असल्याने त्यामध्ये सहभागी होणाऱ्या वधू वरांची माहिती संघटनेपर्यंत पोचवण्यासाठी सर्वांना विनंती करण्यात आली.
            महिला सदस्यांना संघटनेचे ओळखपत्र मिळण्यासाठी प्रत्येकाने विहित नमुन्यामध्ये माहिती देणेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. सध्याचे जीवन धकाधकीचे असल्याने प्रत्येक स्त्रीने स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे असल्याने महिलांनी विशेषतः आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये , आपली परिपूर्ण वैद्यकीय तपासणी वर्षातून एकदा तरी करून घेतल्यास आपले आयुष्य वाढेल असे मार्गदर्शन अध्यक्षा संजना चव्हाण यांनी केले. रचना राजन चव्हाण यांचा वाढदिवस समारंभपूर्वक साजरा करण्यात आला. केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला. अभिलाषा अनिल शिंदे यांनी आभार व्यक्त केले. सभेला बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.






















No comments:

Post a Comment