वारगाव दिनांक : १३ डिसेंबर २०१९ :
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना 'चांगला स्पर्श , न आवडणारा स्पर्श आणि वाईट स्पर्श ' याबाबत जागृत करायला हवे. आज मुलींना आणि मुलांनादेखील अशा प्रकारच्या विविध स्पर्शांना सामोरे जावे लागते. त्यावेळी बालवयातील मुलींना याबाबत बोलताही येत नाही. त्यांना त्याविषयी जागृती करण्याच्या दृष्टीने ' लेक वाचवा , लेक शिकवा ' अंतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या महिला व बालविकास विभागाकडून घडीचित्रे तयार करण्यात आली असून त्यांचे वितरण करताना तरेळे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे प्रभागातील सर्व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
मुख्याध्यापक सहविचार सभा व प्रभागस्तरीय क्रीडामहोत्सवाचे नियोजन करण्याची सभा नुकतीच वारगाव नं. ३ शाळेत संपन्न झाली. त्यावेळी शेर्पे / साळीस्ते केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, कासार्डे केंद्रप्रमुख संजय पवार , खारेपाटण केंद्रप्रमुख नारायण ओटवकर , क्रीडाप्रमुख प्रदीप श्रावणकर , उपक्रीडाप्रमुख केसरकर व तरेळे प्रभागातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी , शिक्षक संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
नियोजनाप्रमाणे सर्व माहिती शिक्षकांना पुनश्च सांगण्यात आली. परसबाग, वनराई बंधारा, शालेय पोषण आहार बदललेला मेनू, वॉटर बेल संकल्पना , शालेय पोषण आहार मागील माहिती भरणे, पटसंख्या अद्ययावत करणे, ३१ डिसेंबर पूर्वी शाळासिद्धी लॉगिन करून त्याच्या ७ फाईल्स जतन करणे ,यु- डायस प्लस ची माहिती PGI प्रमाणे भरणे इत्यादी प्रशासकीय माहिती देण्यात आली.
क्रीडाप्रमुख प्रदीप श्रावणकर यांनी सर्वांना सर्व खेळांविषयी अत्यावश्यक सूचना देऊन प्रभागस्तरीय स्पर्धा नियोजनपूर्वक होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. उपक्रीडाप्रमुख केसरकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

No comments:
Post a Comment