Tuesday, December 3, 2019

७ डिसेंबरला होणार कणकवली नाभिकांची सहविचार सभा

कणकवली : दिनांक : ३ डिसेंबर २०१९ :
          महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ , मुंबई संघटनेची कणकवली तालुका शाखेची सहविचार सभा दिनांक ७ डिसेंबर रोजी शनिवारी दुपारनंतर ठीक २. ३० वाजता संपन्न होणार आहे. त्यावेळी सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा व विचार विनिमय करण्यात येणार आहे. नाभिक संघटनेचे ओळखपत्र , ड्रेसकोडचा पाठपुरावा , कणकवली ते आंगणेवाडी पायी नाभिक वारीचे नियोजन , जिल्हा नाभिक वधुवर मेळावा इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी सभा बोलावण्यात आलेली असून सदर सभेला कणकवली तालुक्यातील तरेळे , खारेपाटण , कनेडी , नांदगाव, फोंडा इत्यादी विभागामधील सर्व नाभिक सलून मालक, चालक , कारागीर, शासकीय कर्मचारी , निवृत्त कर्मचारी आणि तमाम नाभिक बांधवांनी उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेऊन सभा यशस्वी करावी असे आवाहन सचिव प्रवीण कुबल यांनी केले आहे. सभेचे स्थळ अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी असून सर्वांनी वेळीच उपस्थित राहण्याची विनंती जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment