वारगाव : दिनांक १३ डिसेंबर २०१९ :
तरेळे प्रभागस्तरीय बाल कला , क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०१९-२० यंदा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वारगाव नं. ३ या शाळेच्या भव्य पटांगणावर दिनांक १७ व १८ डिसेंबर या दोन दिवसांमध्ये संपन्न होणार आहे.
जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे सदस्य रविंद्र जठार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होणार असून कणकवली पंचायत समितीच्या सभापती सुजाता हळदिवे , उपसभापती सुचिता दळवी , माजी उपसभापती व विद्यमान सदस्य तथा तरेळे बीटशाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप तळेकर , जि .प . सदस्य संजय देसाई , पंचायत समिती सदस्य प्रकाश पारकर , सदस्या तृप्ती माळवदे , कणकवली गटविकास अधिकारी मनोज भोसले , गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर , तरेळे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , वारगाव सरपंच प्रकाश नर , वारगाव उपसरपंच नारायण शेट्ये , वारगाव नं. ३ चे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र गुरव , उपाध्यक्ष तुषार मांडवकर , मुख्याध्यापिका कल्पना सावंत आणि तरेळे प्रभागातील सर्व गावांचे सरपंच , उपसरपंच यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे.
मंगळवार दिनाक १७ डिसेंबर रोजी सकाळी ९. ३० वाजता मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन संपन्न होईल. त्यानंतर दोन्ही लहान व मोठ्या गटाच्या ज्ञानी मी होणार स्पर्धा होतील. त्यानंतर दोन्ही गटाच्या समूहगान व समूहनृत्य स्पर्धा व्यासपीठावर होतील.
बुधवार दिनाक १८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दोन्ही गटाच्या सर्व वैयक्तिक स्पर्धा , सांघिक मैदानी स्पर्धा संपन्न होतील. सायंकाळी ४. ०० वाजता समारोप व प्रशस्तिपत्र वितरण समारंभ होईल. तरी सदर दोन दिवसीय क्रीडामहोत्सव संपन्न करण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , चारही केंद्रांचे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, संजय पवार, नारायण ओटवकर , क्रीडाप्रमुख व खारेपाटण नं.१ शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर , उपक्रीडाप्रमुख सत्यवान केसरकर, यजमान शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना सावंत , सर्व केंद्रमुख्याध्यापक, मुख्याध्यापक , शिक्षकवृंद ,सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी , सर्व शाळा व्यवस्थापन समित्या , माता- पालक संघ, पालक- शिक्षक संघ , ग्रामस्थ व पालकवर्ग वारगाव सर्वजण विशेष मेहनत घेत आहेत. तसेच दोन्ही दिवस खेळाडू विद्यार्थ्यांची , शिक्षकांची चहा, अल्पोपहार व दुपारच्या भोजनाची व्यवस्था शाळा वारगाव नं. ३ च्या वतीने करण्यात आलेली आहे. तरी तरेळे प्रभागस्तरीय स्पर्धेला सर्वांनी उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन तरेळे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment