Thursday, December 19, 2019

तळेरे प्रभागस्तरीय क्रीडामहोत्सवात शेर्पे चॅम्पियन व साळीस्ते उपचॅम्पियन

वारगाव दिनांक : १८ डिसेंबर २०१९ :
          वारगाव नं. ३ च्या भव्य पटांगणावर दोन दिवसाचा क्रीडामहोत्सव ' न भूतो न भविष्यती ' असा संपन्न झाला. दुसऱ्या दिवशी सर्व मैदानी खेळ व वैयक्तिक खेळ चुरशीने पार पडले. सर्व खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवत विजय संपादन केला. त्यात शेर्पे केंद्राने चॅम्पियनशिप तर साळीस्ते केंद्राने उपचॅम्पियनशिप पटकावली. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्रांचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले.
          त्यावेळी तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनी सर्व उपस्थितांचे प्रभागाच्या वतीने स्वागत केले. केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल , संजय पवार, क्रीडाप्रमुख प्रदिप श्रावणकर, उपक्रीडाप्रमुख सत्यवान केसरकर यांनीही स्वागत केले. कार्यक्रमाला प्रकाश पारकर, श्रीकांत शिरसाट, वारगाव गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी , शालेय व्यवस्थापन समिती, सर्व दानशूर प्रतिष्ठित ग्रामस्थ, शिक्षक संघटना पदाधिकारी , खेळाडू आणि बहुसंख्य शिक्षकवृंद उपस्थित होते. क्रीडारसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. सर्व खेळाडूंनी चुरशीच्या सामन्यांमध्ये खिलाडुवृत्तीने आपला विजय पराजय स्वीकारला.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम विभुते यांनी केले. आभार सत्यवान केसरकर यांनी मानले. वारगाव महिला मंडळ यांनी दुपारनंतर गरबा नृत्याचे सादरीकरण केले. त्यात मुलांनीही सहभाग घेतला. एक छान असा आनंद मेळावा संपन्न होत असल्याचे दिसत होते. महिलांच्या संगीत खुर्चीचेही आयोजन करण्यात आले. त्यात शर्वरी शैलेश कोकाटे , तेजस्वी तुषार मांडवकर, ज्योती दीपक नामये यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. त्यांना वारगाव उपसरपंच नाना शेट्ये , विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांजकडून अनुक्रमे ५००, ३०० आणि २०० रुपयांचे रोख बक्षीस वितरण करण्यात आले. दोन दिवसीय समारंभात वारगाव गावातील सर्व नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल प्रभागाच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
           निकालपत्रक :

  1. ५० मीटर धावणे : लहान गट : मुलगे :प्रथम : सुजल सुरेश शिर्सेकर, शिडवणे कोनेवाडी  , द्वितीय : शिवम अनंत शिंदे , नडगिवे नं. १
  2. ५० मीटर धावणे : लहान गट : मुली :प्रथम : अनुष्का चंद्रकांत पांचाळ , दारुम नं. १ , द्वितीय : साक्षी आनंद शेट्ये , कासार्डे जांभूळ 
  3. १०० मीटर धावणे : लहान गट : मुलगे :प्रथम : आदित्य पांडुरंग भोवड , शिडवणे नं. १ , द्वितीय : फिदयान दिलनवाज सोलकर , तळेरे नं. १ 
  4. १०० मीटर धावणे : लहान गट : मुली  :प्रथम : सानिका सूर्यकांत भालेकर , चिंचवली मधली , द्वितीय : समीक्षा जिवाजी जाधव , वारगाव नं. १ 
  5. उंचउडी : लहान गट : मुलगे : प्रथम : आर्यन अजय कदम , कासार्डे साटमवाडी , द्वितीय : तन्मय किशोर गुरव , खारेपाटण नं. १ 
  6. उंचउडी : लहान गट : मुली : प्रथम : कोमल महेश शेलार , शेर्पे नं. १ , द्वितीय : आर्या निलेश गुरव , खारेपाटण नं. १ 
  7. लांबउडी : लहान गट : मुलगे : प्रथम : सुजल सुरेश शिर्सेकर , शिडवणे कोनेवाडी , द्वितीय : आशिष भानुदास राठोड , कासार्डे देऊलकर 
  8. लांबउडी : लहान गट : मुली  : प्रथम : कोमल महेश शेलार , शेर्पे नं. १ , द्वितीय : साक्षी आनंद शेट्ये , कासार्डे जांभूळ 
  9. ५० रिले : लहान गट : मुलगे : आयुष नितीन जाधव, सुयश बाळकृष्ण पेटकुलकर , यश संतोष पेटकुलकर आणि फिदयान दिलनवाज सोलकर , सर्व केंद्र साळीस्ते 
  10. ५० रिले : लहान गट : मुली  : आयुषी शशांक  तळेकर , धनश्री चंद्रकांत कानकेकर , समिक्षा जिवाजी जाधव , अनुष्का चंद्रकांत पांचाळ , सर्व साळीस्ते केंद्र 
  11. समूहगान : लहान गट :  संयुक्त : विजेता  : तळेरे नं. १ ( केंद्र साळीस्ते ) ,  उपविजेता : शिडवणे कोनेवाडी 
  12. समूहनृत्य : लहान गट : संयुक्त : विजेता : तळेरे नं. १ ( केंद्र साळीस्ते ) , उपविजेता : खारेपाटण रामेश्वरनगर ( केंद्र खारेपाटण ) 
  13. कबड्डी : लहान गट : मुलगे : विजेता : केंद्र कासार्डे , उपविजेता : केंद्र खारेपाटण 
  14. कबड्डी : लहान गट : मुली : विजेता : केंद्र साळीस्ते , उपविजेता : केंद्र कासार्डे 
  15. खोखो : लहान गट : मुलगे : विजेता : केंद्र शेर्पे ( शिडवणे  नं. १ ), उपविजेता : केंद्र खारेपाटण 
  16. खोखो : लहान गट : मुली : विजेता : केंद्र शेर्पे ( शिडवणे नं. १ )
  17. लंगडी : लहान गट : मुलगे : विजेता : साळीस्ते , उपविजेता : कासार्डे 
  18. लंगडी : लहान गट : मुली  : विजेता : शेर्पे  , उपविजेता : खारेपाटण 
  19. ज्ञानी मी होणार : लहान गट : विजेता : कासार्डे ब्राह्मणवाडी ( वेदांत अविनाश जैतापकर , मानसी नारायण जैतापकर )
  20. १०० मी धावणे : मोठा गट : मुलगे : प्रथम : वैभव संजय कुडाळकर ( कुरंगवणे खैराट ), द्वितीय : विकास प्रकाश पवार ( कासार्डे नं. १ )
  21. १०० मी धावणे : मोठा गट : मुली : प्रथम : अक्षता बाळकृष्ण पाटणकर ( खारेपाटण नं. १ ), द्वितीय : लक्षता  बाळकृष्ण धावडे ( वारगाव नं. ३ )
  22. २०० मी धावणे : मोठा गट : मुलगे : प्रथम : आदित्य दशरथ जाधव ( वारगाव नं. १ ), द्वितीय : तेजस दत्ताराम गोसावी ( कुरंगवणे खैराट )
  23. २०० मी धावणे : मोठा गट : मुली : प्रथम : सानिका श्रीराम पाष्टे ( शिडवणे नं. १ ), द्वितीय : सानिया उस्मान जैतापकर ( शेर्पे नं. १ )
  24. लांबउडी : मोठा गट : मुलगे : प्रथम : अथर्व महेश कदम ( दारुम नं. १ ), द्वितीय : प्रफुल्ल संतोष मण्यार  (  नडगिवे नं. १ )
  25. लांबउडी : मोठा गट : मुली : प्रथम : अक्षता बाळकृष्ण पाटणकर ( खारेपाटण नं. १  ), द्वितीय : पूजा नंदू राठोड  ( कासार्डे  नं. १ )
  26. उंचउडी : मोठा गट : मुलगे : प्रथम :विकास प्रकाश पवार ( कासार्डे  नं. १ ), द्वितीय : विशाल जगन्नाथ चव्हाण   ( कासार्डे नं. १ )
  27. लांबउडी : मोठा गट : मुली : प्रथम : अनुजा अनंत शेलार  ( कासार्डे देऊलकर  ), द्वितीय : अस्मिता प्रकाश राठोड  (  नडगिवे नं. १ )
  28. गोळाफेक  : मोठा गट : मुलगे : प्रथम : आदित्य दशरथ जाधव  ( वारगाव नं. १  ), द्वितीय : वैभव संजय कुडाळकर   ( कुरंगवणे खैराट  )
  29. गोळाफेक  : मोठा गट : मुली : प्रथम : कश्यपी राजेंद्र माईणकर ( दारुम नं. १ ), द्वितीय : नेहा पिंटू चव्हाण  ( कासार्डे देऊलकर  )
  30. १०० रिले : मोठा गट : मुलगे : प्रथम : केंद्र कासार्डे , विकास प्रकाश पवार, विशाल जगन्नाथ पवार, गणेश विलास पवार , रोहित मधुकर राठोड , सर्व कासार्डे नं. १, उपविजेता : केंद्र साळीस्ते 
  31. १०० रिले : मोठा गट : मुली : प्रथम : केंद्र साळीस्ते , दिक्षा दिपक जाधव , कावेरी तुकाराम कोंडविलकर , ख़ुशी प्रणव पानवाला , वैभवी विठोबा खानविलकर , उपविजेता : केंद्र शेर्पे 
  32. कबड्डी : मोठा गट : मुलगे : विजेता : केंद्र कासार्डे नं. १  , उपविजेता : केंद्र शेर्पे 
  33. कबड्डी : मोठा गट : मुली : विजेता : कासार्डे , देऊलकर  , उपविजेता : केंद्र शेर्पे 
  34. खोखो  : मोठा गट : मुलगे  : विजेता : शेर्पे ( शिडवणे नं. १ ) , उपविजेता : केंद्र खारेपाटण 
  35. खोखो  : मोठा गट : मुली : विजेता : शेर्पे ( शिडवणे नं. १ ) , उपविजेता : केंद्र खारेपाटण
  36. लंगडी  : मोठा गट : मुलगे  : विजेता : शेर्पे ( शिडवणे नं. १ ) , उपविजेता : केंद्र कासार्डे
  37. लंगडी  : मोठा गट : मुली  : विजेता : कासार्डे (देऊलकर ) , उपविजेता : केंद्र साळीस्ते 
  38. ज्ञानी मी होणार : मोठा गट : संयुक्त : केंद्र खारेपाटण ( खारेपाटण नं. १ ) श्रुती संजय शेट्ये , पार्थिव भूपेश पाटकर 
  39. समूहगान : मोठा गट : संयुक्त : केंद्र साळीस्ते ( वारगाव नं. १) , उपविजेता : केंद्र शेर्पे ( शिडवणे नं. १ )
  40. समूहनृत्य : मोठा गट : संयुक्त : केंद्र शेर्पे ( शेर्पे नं. १), उपविजेता : केंद्र साळीस्ते ( दारुम नं. १ )
  41.  



No comments:

Post a Comment