कासार्डे : दिनांक १६ डिसेंबर २०१९ :
सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये क्रीडामहोत्सवाची धामधूम सुरु आहे. मुले खेळांमध्ये आपले कौशल्य पणाला लावून विजेतेपद मिळवण्यासाठी अविरत सराव करत आहेत. धावण्याचा सराव करताना अनवाणी पायानीच २०० मीटर पर्यंतची मजल मारत आहेत. मुलांच्या पायांना धावपट्टीवर धावताना होणारा त्रास कमी व्हावा म्हणून कासार्डे केंद्रशाळेने एक आगळा वेगळा उपक्रम राबवून सर्वांसाठी एक चांगला आदर्श घालून देण्याचा प्रयत्न केला आहे. ५० मीटर, १०० मीटर , २०० मीटर धावण्यामध्ये केंद्रस्तर विजेतेपद मिळवणाऱ्या धावपटूंना देणगीदारांच्या आर्थिक सहाय्यामधून उत्तम दर्जाच्या क्रीडाशूज व सॉक्सचे वितरण करून प्रभाग, तालुका आणि जिल्हा स्तरावर अधिक चपळपणे धावण्यासाठी प्रेरणा दिली आहे.
यासाठी जि . प. सदस्य संजय देसाई, कासार्डे सरपंच बाळाराम तानावडे , शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , ग्रामपंचायत सदस्य गणेश पाताडे , सामाजिक कार्यकर्ते दिपक सावंत यांनी आर्थिक सहकार्य करून उपक्रम राबविला आहे. त्यावेळी कासार्डे केंद्रशाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य , उपसरपंच बाबुभाई पेडणेकर , पत्रकार गुरुप्रसाद सावंत , कासार्डे ग्रामविकास अधिकारी प्रभाकर कुडतरकर , सर्व विजेते धावपटू खेळाडू , पालकवर्ग आणि शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच बाळाराम तानावडे यांनी सदर उपक्रम अतिशय उल्लेखनीय असल्याचे उद्गार काढले.
केंद्रशाळा कासार्डे शाळेतील सर्व शिक्षकवर्ग यांनी कार्यक्रम राबवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. असा अनोखा उपक्रम राबवून खेळाडू विद्यार्थ्यांना आवश्यक अशी मदत केल्याबद्दल सर्व देणगीदारांचे पालकवर्गाकडून , अधिकारीवर्गाकडून व पदाधिकाऱ्यांकडून विशेष कौतुक होत आहे. केंद्रप्रमुख संजय पवार यांच्या संकल्पनेतून व देणगीदारांच्या दातृत्वातून संपन्न झालेल्या या अभिनव उपक्रमाबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनी सर्व दानशूर पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत व पुढील
क्रीडामहोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सदर उपक्रम हा प्रभाग , तालुका, जिल्हास्तरावर प्रेरणादायी व दिशादर्शक ठरेल अशाप्रकारे तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनी म्हटले आहे.

No comments:
Post a Comment